सावंतवाडीत भाजपचा स्वीकृतसाठी दावा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

सावंतवाडी - काँग्रेसकडून उपनगराध्यक्षपदावर दावा केला जात असतानाच आज येथे झालेल्या शहर भाजपच्या बैठकीत उपनगराध्यक्षांसह स्वीकृत नगरसेवकाच्या पदावर दावा करण्यात आला आहे.

युतीचा धर्म पाळून येथील पालिकेत शिवसेनेला सहकार्य केल्यानंतर आपल्याला स्वीकृत नगरसेवकपद देण्यात यावे असा दावा करून उपनगराध्यक्ष म्हणून पक्षाचे अधिकृत सदस्य आनंद नेवगी यांचे नाव एकमताने ठरविण्यात आले आहे. याबाबत वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे ठरविले आहे.

शहर भाजपची बैठक आज येथील पर्णकुटी विश्रामगृहावर माजी नगरसेवक उमेश कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी कल्पना तेंडुलकर, अमित परब, उमेश कोरगावकर, पुखराज पुरोहित, आदिती सामंत, सुप्रिया केसरकर, परिणिता वर्तक, तृप्ती शंकरदास, सरोज कुडतरकर, शिवप्रसाद कोळंबकर, साक्षी कारिवडेकर, सचिन कारिवडेकर आदी उपस्थित होते.

या वेळी झालेल्या चर्चेत येथील पालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप शिवसेनेला सहकार्य करणार आहे. त्यामुळे भाजपचा अधिकृत चेहरा म्हणून उपनगराध्यपदी श्री. नेवगी यांना संधी देण्यात यावी तसेच भाजपकडून होणारे सहकार्य लक्षात घेता त्या ठिकाणी स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपमधील सदस्याचा विचार करण्यात यावा, अशी मागणी वरिष्ठांकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वीकृत नगरसेवकपदासाठी माजी नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष मनोज नाईक यांच्यासह शहर अध्यक्ष संजू शिरोडकर, आदिती सामंत आणि कल्पना तेंडुलकर यांची नावे देण्यात आली आहेत. याबाबत वरिष्ठांनी योग्य तो निर्णय घ्यावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. या वेळी नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या श्री. नेवगी यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.

Web Title: Maharashtra BJP accepted the claim