कणकवली : नीतेश राणे पाचव्या फेरीतही अव्वल |Election Results 2019

कणकवली : नीतेश राणे पाचव्या फेरीतही अव्वल |Election Results 2019

सिंधुदुर्ग : कणकवली मतदारसंघात भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांनी पाचव्या फेरीअखेर 8483 मतांची आघाडी घेतली आहे. देवगड तालुक्यातील मतदान केंद्रांची मतमोजणी सुरू आहे. यात पहिल्या टप्प्यापासून नीतेश राणे यांनी आघाडी घेतली आहे.
सावंतवाडी मतदारसंघात दुसऱया फेरीअखेर शिवसेनेचे दीपक केसरकर 703 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी एकूण 1110 मतांची आघाडी घेत अपक्ष
उमेदवार राजन तेली यांना पिछाडीवर टाकले आहे.  
कणकवली मतदारसंघात चौथ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार नीतेश राणे 6122 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार सतीश सावंत यांना मागे टाकत
आघाडी घेतली आहे.
पहिल्या फेरीत नीतेश राणे 713 मतांनी आघाडीवर होते. शिवसेनेचे उमेदवरा सतीश सावंत यांनी त्यांनी पिछाडीवर टाकले आहे.
सावंतवाडी मतदारसंघात पहिल्या पोस्टल मतदान फेरीत शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर 1200 मतांनी, तर कुडाळ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक
यांनी आघाडी घेतली आहे. सावंतवाडीत अपक्ष राजन तेली यांना केसरकर यांनी मागे टाकले आहे. कुडाळमध्ये अपक्ष आणि नारायण राणेंचे सर्मथक रणजित देसाई
पिछाडीवर आहेत.
सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पालकमंत्री दीपक केसरकर यांना आव्हान दिले आहे. कुडाळमध्ये
भाजपच्या पाठबळावर अपक्ष रणजित देसाई व आमदार वैभव नाईक यांच्यात लढत होत आहेत. सर्वांत हायव्होल्टेज लढत कणकवलीत होत असून, येथे शिवसेनेचे
सतीश सावंत आणि भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्यात तगडा मुकाबला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतदेखील प्रचाराचा मुख्य रोख राणे यांच्याभोवतालीच
फिरताना दिसत आहे. राज्यात भाजप - शिवसेनेची युती असतानाही नारायण राणे यांचे सुपुत्र नीतेश राणे यांनी शिवसेनेने थेट आव्हान दिल्याने अकरावी सार्वत्रिक
विधानसभा निवडणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात चुरशीची ठरली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com