विजेच्या धक्क्याने विज कर्मचारी गंभीर जखमी

सुनील पाटकर
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

महाड (रायगड): महाड शहरातील आपला बाजार समोर असलेल्या ट्रान्सफार्मरवर काम करणारा महावितरणचा कर्मचारी दुरूस्तीचे काम करत असताना अचानक सुरू झालेल्या विद्युत प्रवाहाने गंभीररित्या जखमी झाला आहे. आज (शुक्रवार) सकाळी ही घटना घडली.

सुधीर दिनकर पाटील हे जखमीचे नाव असून, ते विद्युत सहाय्यक म्हणून काम करतात. विद्युत ट्रान्सफार्मवर आज सकाळी काम करण्याकरीता दोन कर्मचारी चढले होते. या दरम्यान विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. मात्र, यातील ट्रान्सफार्मवरील ए.बी. स्वीच तुटून पडल्याने बंद प्रवाह पुन्हा सुरळीत झाला. यामुळे लागलेल्या विजेच्या धक्क्याने याठिकाणी काम करणारे विद्युत सहाय्यक सुधीर दिनकर पाटील यांना विजेचा झटका लागल्याने लटकून राहिले. सुधीर पाटील हे या अपघातात भाजले गेल्याने त्यांना अधिक उपचाराकरीता मुंबई येथे हलवले आहे.

Web Title: mahavitaran employee seriously injured by electric shock at mahad