रहिवाश्यांच्या मागणीनंतर महावितरणकडून स्विच बाँक्स बदली

लक्ष्मण डूबे 
मंगळवार, 1 मे 2018

रसायनी (रायगड) : वासांबे मोहोपाडा येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहतीत प्रिया स्कूलकडे जाणाऱ्या रस्त्याच्याकडेला रोहित्राच्या स्विच बाँक्सची दुरावस्था झाली होती. स्विच बाँक्स बदली करण्यात यावा ही रहिवाशांची मागणी होती. सकाळने या मागणीची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची विज महावितरणने दख्खल घेतली आहे. रोहित्राचा स्विच बाँक्स बदली केला असल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. 

येथील महावितरणच्या रोहित्रा वरून एमआयडीसी काँलनी, जैन काँम्पलँक्स, इनाँक्स इअर प्राँडक्ट काँलनी, बाँम्बे डाईन्ग लिमिटेड काँलनी, अदित्य लँब आदि ठिकानी विज पुरवठा करण्यात येत आहे. येथील  रोहित्र बाँक्सची गंजुन चाळण झाली होती. पावसाळ्यात पाणी गेले तर विज पुरवठा खंडित होईल आशी शक्यता नागरिकांनी व्यक्त केली होती. तसेच जाताना विद्यार्थ्यांनी उघड्या स्विच बाँक्स मधील तारांना धक्का लावला तर दुर्घटनाची भिती व्यक्त करण्यात आली होती. 

दरम्यान स्विच बाँक्स पेटी बदली करण्याची मागणीची बातमी सकाळने 14 एप्रील रोजी अंकात प्रसिद्ध केली.दरम्यान या बातमीची दख्खल वासांबे मोहोपाडा येथील विज महावितरण कार्यालयातील साहाय्यक अभियंता   किशोर पाटील यांनी घेतली. आणि काल सोमवार रोजी स्विच बाँक्स बदली केला आहे. 

Web Title: mahavitran work in rasayani