...अन् दरीत कोसळणारा टँकर थोडक्यात वाचला

pune
pune

मोखाडा : मोखाडा-त्र्यंबकेश्वर दरम्यान तोरंगण घाटात नेहमीच अपघात होतात. अशाच एका तीव्र उतार आणि वळणावर धोकादायक ठिकाणी बांधकाम विभागाने जुजबी उपाय म्हणून मुरूम आणि मातीचा भरावं रस्त्याच्याकडेला केला आहे. याच ठिकाणी गाडीचे ब्रेक निकामी झालेला टँकर थेट भरावात अडकला. टँकरची चाके भरवात अडकल्याने दरीत कोसळण्यापासून वाचला आहे. त्यामुळे मोठा अपघात टळला आहे. 
            

मोखाड्यातील तोरंगण घाटात मे महिन्यात गुजरातच्या भाविकांच्या लक्झरी बसला अपघात झाला होता. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला होता. या घाटात नेहमीच अपघाताच्या घटना घडतात. सतत घडणाऱ्या धोकादायक अपघाताच्या ठिकाणी बांधकाम विभागाने जुजबी मलमपट्टी म्हणून, रस्त्याच्या कडेला मुरूम आणि मातीचा भरावं टाकला आहे. मात्र,  भरावामुळे मोठा अपघातच टळला आहे.  

गुजरात राज्याकडे जाणाऱ्या ऑईल टँकरचे घाटात ब्रेक निकामी झाले. त्यावेळी  घाटातील धोकादायक ठिकाणवरुन टँकर थेट दरीत कोसळणार होता. मात्र, ऐनवेळी रस्त्याच्या कडेला केलेल्या मुरूम आणि मातीचा भरावात टँकरची चाके फसली अन् अपघात टळला आहे.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com