कणकवली तालुक्यावर पावसाची अवकृपा, नुकसानीचा आकडा थक्क करणारा

Major damage in Kankavli taluka due to rain
Major damage in Kankavli taluka due to rain

कणकवली (सिंधुदुर्ग) - तालुक्‍यातील तरंदळे, कसवण आणि दिगवळे गावात अतिवृष्टीमुळे घरांचे आणि पडवीचे एक लाख 45 हजार 300 रुपयांचे नुकसान झाले. कणकवली शहरात हॉटेल आणि बॅंक परिसरात पावसाचे पाणी शिरल्याने 7 लाख 13 हजार नुकसान झाले. तर तालुक्‍यात आतापर्यंत 8 लाख 58 हजार 300 रूपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत महसूलच्या तलाठ्यांनी पंचनामा केला. 

तालुक्‍यात गेले चार दिवस अतिवृष्टी होत आहे. या अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत महसूल विभागाने नोंदविलेल्या पंचनाम्यात तरंदळे येथे अभिषेक आत्माराम विखाळे यांच्या राहत्या घराचे अतिवृष्टी आणि वादळामुळे नुकसान झाले. छप्पराची कौले आणि भिंत कोसळली. कसवण येथील भारती भदू कोरगांवकर यांच्या घरावर झाड कोसळल्याने नुकसान झाले आहे. तसेच दिगवळे रांजणवाडी येथील पंढरीनाथ बाबू सकपाळ यांच्या घराची पडवी पावसामुळे कोसळून नुकसान झाले आहे. 

कणकवली शहरातील काही भागात अतिवृष्टीचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. यात सारस्वत बॅंकेचे लाकडी साहित्य आणि इतर साहित्याचे एक लाख 10 हजार, हॉटेल रॉयल सिटी एक लाख 20 हजार, हॉटेल सुगरण 2 लाख 3 हजार, विरेंद्र नाचणे यांचे एक लाख 10 हजार आणि विजय सावंत यांचे 95 हजाराचे नुकसान झाले आहे. 

संपादन ः राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com