माकडताप निवारणास युद्धपातळीवर प्रयत्न - शेखर सिंह

माकडताप निवारणास युद्धपातळीवर प्रयत्न - शेखर सिंह

सिंधुदुर्गनगरी - बांदा परिसरात पसरलेले माकडतापाचे संकट थोपविण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेसह इतर जिल्ह्यातील, गोव्यातील तज्ज्ञांचीही मदत घेण्यात येत आहे. स्थिती लवकरच आटोक्‍यात येईल, असा विश्‍वास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केला.

माकडताप नियंत्रणासाठी योजलेल्या उपायांची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली. यात म्हटले आहे की, दैनंदिन व नियमित सर्वेक्षण घरोघरी जाऊन केएफडी या आजाराबाबत आरोग्य शिक्षण व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. 

केएफडी जोखीमग्रस्त भागात स्लाइड शोव्दारे माहिती देण्यात येत आहे. केएफडी आजाराबाबतच्या माहितीपत्रिकांचे घरोघरी जाऊन वाटप करण्यात आलेले आहे. 

बाधित भागातील शेतात काम करणाऱ्या व जंगलभागाच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षेसाठी डीएमपी ऑईलचा पुरवठा केला आहे. बाधित भागात माकड मृत झाल्यास त्यापासून आजाराचा फैलाव होऊ नये म्हणून कीटकनाशक मॅलेथिऑन पावडरचा पुरवठा जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्याकडे साठा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. अतिजोखमीच्या भागातील लोकांना लसीकरण करण्यात आलेले आहे.

संभाव्य धोका टाळण्यासाठी जिल्हास्तरीय व विभागीय कीटक समाहारकामार्फत बाधित भाग व लगतच्या भागातील टिक्‍स संकलन करून एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठविणेत येतात व बाधित टीक्‍स आढळलेल्या भागात त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येते. 
उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग व प्राथमिक आरोग्य केंद्र बांदा येथे मणिपाल व्हायरालॉजी सेंटर कर्नाटक यांच्या सौजन्याने के. एफ. डी. या आजाराची तपासणी करण्यात येत आहे. दूषित रुग्णांवर त्वरित आरोग्य यंत्रणेमार्फत औषधोपचार करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, वनविभाग या विभागाची प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याकरीता एकत्रित आढावा सभा घेण्यात आली. 

केएफडी रिसपॉन्स टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. त्वरित उपचारासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.  

बांदा-सटमटवाडीत उपचार केंद्र 
बाधित भागात गोवा मेडिकल कॉलेज व कोल्हापूर येथे वैद्यकीय पथके पाठवून रुग्णांना सेवा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील संदर्भसेवेसाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे पाठविण्यात येणाऱ्या रुग्णांसाठी गोवा मेडिकल कॉलेज येथे संदर्भसेवा कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. रुग्णांना त्वरित आरोग्य सेवा मिळावी म्हणून बांदा-सटमटवाडी येथे वैद्यकीय उपचार केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com