होळी करा लहान, पोळी करा दान !

अमित गवळे
मंगळवार, 19 मार्च 2019

पाली - दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी धुलिवंदन व रंगपंचमीला घातक रासायनिग रंगांचा वापर, पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळुन प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करू या… तसेच होळी लहान करा, पोळी दान करा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत करण्यात आले आहे.

दरवर्षी अंनिसच्या या अभियानास मोठा पाठिंबा मिळतांना दिसत आहे. उन्हाच्या तडाख्यात होळीच्या निमित्तानं जाळल्या जाणा-या लाकडांची ऊब खरं तर ना माणसाला फायदेशीर आहे, ना पर्यावरणाला. सरसकट वृक्षांची कत्तल करून ती होळीसाठी वापरणं हा उत्सवाचा आणि उत्साहाचाही अतिरेकच म्हणायला हवा असे अंनिसतर्फे सांगण्यात आले आहे. पोळी होळीत न जळता अंनिस कार्यकर्त्याला आणून द्या. त्या पोळ्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गरीब वस्त्यांवर जाऊन हे कार्यकर्ते वाटणार आहेत. त्यासाठी अंनिसच्या स्थानिक शाखांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

अशी साजरी करा होळी
- होळीसाठी झाडे तोडू नका
- अनेक ठिकाणी होळी पेटविण्या ऐवजी गावात एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी पेटवा.
- होळीनिमित्त बोंबा मारणे, अपशब्द उच्चारणे यापासून कटाक्षाने लांब रहा
- होळीमध्ये पोळी जाळण्याऐवजी ती पोळी गरजूंना द्या
- आपल्यातील दुर्गुणाची होळी करा
- पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नैसर्गिक कोरड्या रंगानी होळी/रंगपंचमी खेळा
- होळीमध्ये प्लास्टिक, टायर सारखे हानिकारक वस्तू जाळू नका
- होळी/रंगपंचमी साठी पर्यावरण-स्नेही रंग किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करा
- फुगे मारणे टाळा: रंग, पाणी, घाण इत्यादींनी भरलेले फुगे काही लोक फेकून मारतात, त्यांना अटकाव करा

होळीत पोळी न टाकता ती बाजुला काढून ठेवा, कोरडी राहिल असे पहा, एका कोरड्या खोक्यात, डब्यात गोळा करा. आपल्या गावातील एखादी गरीब वस्ती निवडून पोळी वाटपाचा कार्यक्रम करू शकतात. अधिक मार्गदर्शन मिळविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांना संपर्क करा.
- नितीनकुमार राऊत, राज्य सरचिटणीस, महा. अंनिस

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: make small donation on the occasion of holi