मालवणात भाजपचा झेंडा फडकेल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑगस्ट 2016

मालवण : शहरात पालिका निवडणुकीचे वारे वाहत असून, सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. निवडणूक प्रभाग क्रमांक चार या मेढा भागातील कार्यालयाचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. या वेळी प्रभाग अध्यक्ष गणेश कुशे यांच्यासह भाजपच्या टीमचे कौतुक करत पालिकेवर भाजपचा झेंडा निश्‍चितच फडकेल, असा विश्‍वास श्री. चव्हाण यांनी व्यक्त केला.
 
या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, शहराध्यक्ष बबलू राऊत, विलास हडकर, महेश मांजरेकर, भाऊ सामंत, आप्पा लुडबे, गोपी पालव, जयदेव कदम, आबा कोंडुसकर, विजय केनवडेकर, विनोद भोगावकर, पूर्वा ठाकूर, पूजा सरकारे, गजानन ठाकूर, बबन परुळेकर, विलास सामंत, दादा कांदळकर, महेश जावकर, भाई कासवकर आदी उपस्थित होते.
 
भाजपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्‍नांची सोडवणूक केली जात आहे. शहरातील समस्या शासनाच्या माध्यमातून सोडवून घेण्यासाठी भाजप कार्यकर्ते आग्रही आहेत. मालवणला शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा लाभला असून, किल्ले सिंधुदुर्गच्या माध्यमातून लाखो पर्यटक मालवणला भेट देत आहेत. अशा स्थितीत येथील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या निश्‍चितच प्राधान्याने दूर केल्या जातील. यासह नागरिकांना अपेक्षित असा विकास भाजपच्या माध्यमातून साकारला जाईल, असे श्री. चव्हाण यांनी या वेळी स्पष्ट केले.
 
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अपघाताचे प्रमाणही वाढलेले आहे. अशा स्थितीत अपघातानंतर सर्वसामान्य कुटुंबाचा विचार करता शहरातील एक हजार नागरिकांचा मोफत अपघाती विमा भाजप प्रभाग चार कार्यालयाच्या माध्यमातून उतरविण्यात आला. शासनाच्या विविध योजनांची माहिती देताना त्याचे थेट लाभ नागरिकांपर्यंत पोचवले जाणार आहे, अशी माहिती प्रभाग अध्यक्ष गणेश कुशे यांनी दिली.

Web Title: Malavanata BJP flag