मळगावचे पूल धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष

Malgaon bridge is dangerous
Malgaon bridge is dangerous

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) -  मळगाव (ता.सावंतवाडी) रवळनाथ मंदिरलगतच्या रस्त्यावर असलेले दोन्ही पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. अनेक वर्षांपासून दोन्ही पूल नादुरुस्त असतानाही किरकोळ डागडुजी वगळता काही काम झाले नाही. त्यामुळे या पुलांची तत्काळ दुरुस्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. 

दरवर्षी या दोन्ही पुलांवरुन मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहते. त्यामुळे ते अधिकच धोकादायक बनले आहेत. या रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झाली असून पावसाळ्यात दरवर्षी जांभा दगड टाकून खड्डे बुजवण्याची मलमपट्टी केली जाते; मात्र या रस्त्याचे नूतनीकरण होण्याची गरज आहे. हा रस्ता झाराप-पत्रादेवी बायपासवरून मळगाव व नेमळे या दोन्ही गावांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते.

या रस्त्यालगत गावाचे मोठे मंदिर असलेले रवळनाथ मंदिर आहे. त्यामुळे गावातील महत्त्वाचा रस्ता असूनही प्रशासनाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या रस्त्याबरोबरच सुरेश प्रभू केंद्रीय मंत्री असताना मळगाव - ब्राह्मणआळी येथे जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे नुतनीकरण पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केले होते. या रस्त्याचीही सध्या प्रचंड दुरवस्था झाली असून या मुख्य रस्त्यावरील मोठा पुलही कमकुवत झाला आहे. 

माजी पंचायत समिती सभापती राजू परब यांच्या कार्यकाळात मळगाव-नेमळे या मुख्य रस्त्याचे पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत नूतनीकरण झाले होते. जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे यांच्या माध्यमातून मळगाव-ब्राह्मणआळी रस्त्याच्या एक किलोमीटर अंतराचे नूतनीकरण झाले आहे; मात्र या पलीकडे मळगावातील उर्वरित रस्ते वाहतुकीसाठी धोकादायक बनले आहेत. या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com