अतिउत्साहीपणा आला अंगलट ; चारचाकी गाडी फसली वाळुत, काढताना फुटला घाम

राजेश कळंबटे | Friday, 30 October 2020

गाडी एक फुटापर्यंत वाळूत फसली आणि अखेर स्थानिकांनी प्रयत्न करून गाडी बाहेर काढली. 

रत्नागिरी : पर्यटकांचा अतिउत्साहीपणा अंगलट आल्याची घटना गुरुवारी तालुक्यातील मालगुंड समुद्र किनारी घडली. मालगुंड समुद्र किनाऱ्यावर चारचाकी नेण्याचा प्रयत्न पर्यटकांच्या चांगलाच नडला. मालगुंड समुद्र किनारी वाळूत चारचाकी गाडी फसली आणि गाडी बाहेर काढताना पुरती दमछाक उडाली. कोरोना मुळे पर्यटन व्यवसाय पूर्णतः ठप्प झाला होता. मात्र कोरोनाची भीती कमी होऊ लागल्यामुळे पर्यटक कोकणाकडे वळू लागले आहेत.  

हेही वाचा - मी सत्तेत असताना साथ मात्र मला विरोधकांनी दिली म्हणत कुडाळचे सभापती भाजपमध्ये दाखल -

बहुतांशी पर्यटक खासगी गाड्या घेऊन येत आहेत. गणपतीपुळे, हर्णे सहकिनारी भागात त्यांचा राबता वाढला आहे. यामध्ये सर्वाधिक तरुणांनाच सहभाग अधिक आहे. लॉकडाउनमुळे घरात अडकून पडलेल्यांना मोकळा श्वास घेण्यासाठी कोकणचे किनारे खुणावत आहेत. मात्र फिरण्याच्या नादात अतिउत्साह या पर्यटकांना अडचणीत आणत आहे. रत्नागिरीत समुद्रकिनारी येणाऱ्या पर्यटकांच्या अतिउत्साहीपणाचा फटका बसल्याच्या अनेक घटना ताज्या असताना गुरुवारी याचा पुन्हा अनुभव आला. 

सांगली येथून गणपतीपुळे येथे चारचाकी वाहनातून पर्यटक आले होते. परिसर फिरण्यासाठी हे पर्यटक मालगुंड समुद्रकिनाऱ्यावर पोचले. या पर्यटकांनी किनाऱ्यावर वाळूत गाडी घालण्याचा प्रयत्न केला आणि बघता बघता गाडी वाळूत फसली. गाडी एक फुटापर्यंत वाळूत फसली आणि अखेर स्थानिकांनी प्रयत्न करून गाडी बाहेर काढली. 

हेही वाचा -  दैव बलवत्तर म्हणून वाचला तीचा जीव पण सहा म्हशीं कोसळल्या जागेवरच अन् -

वाळूमध्ये गाडी अडकल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या होत्या. यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी किनाऱ्यावर गस्तीच नियोजन केले होते. कोरोनामुळे हे सगळेच थांबले. भविष्यात पर्यटक वाढणार असल्यामुळे पुन्हा किनारी भागात सतर्कता बाळगावी लागणार आहे. अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.

 

संपादन - स्नेहल कदम