कडक उन्हात न्याहाळा समुद्र 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

रत्नागिरी : कडाक्‍याच्या उन्हामध्ये किनाऱ्यावर बसून समुद्र न्याहाळण्यासाठी मालगुंड किनाऱ्यावर शॅकस्‌च्या धर्तीवर बांबू आणि गवताच्या झोपड्या उभारल्या आहेत. पर्यटकांसाठी ते प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या गेलेल्या गणपतीपुळेकडील पर्यटक मालगुंडकडे वळविण्यात काहीअंशी यश आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी मालगुंड किनारा सज्ज झाला आहे. 

रत्नागिरी : कडाक्‍याच्या उन्हामध्ये किनाऱ्यावर बसून समुद्र न्याहाळण्यासाठी मालगुंड किनाऱ्यावर शॅकस्‌च्या धर्तीवर बांबू आणि गवताच्या झोपड्या उभारल्या आहेत. पर्यटकांसाठी ते प्रमुख आकर्षण ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या गेलेल्या गणपतीपुळेकडील पर्यटक मालगुंडकडे वळविण्यात काहीअंशी यश आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी मालगुंड किनारा सज्ज झाला आहे. 

मुंबई-पुणेचा पर्यटक कवी केशवसुतांच्या मालगुंडमध्ये थांबा घेत आहे. या निवांत किनाऱ्यावर पर्यटकांना सुविधा नव्हत्या. त्या मेरीटाईम बोर्ड, मालगुंड ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या असून, या मोसमात पर्यटकांच्या स्वागतासाठी हा किनारा सज्ज झाला आहे. त्यातून पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डमार्फत निर्मल सागरतट अभियानांतर्गत मालगुंड समुद्र किनारी पर्यटकांना मूलभूत सुविधा व पर्यटकांची सुरक्षितता यांच्या अनुषंगाने, तसेच स्थानिकांना रोजगार संधी मिळावी, या हेतूने सुविधा पुरविण्यात आल्या. 

कोकणातील निसर्गरम्य समुद्रकिनारे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. त्यातील रत्नागिरी जिल्ह्यातील मालगुंड समुद्रकिनारा आहे. समुद्रकिनारी पर्यटकांची रहदारी वाढत आहे. ग्रामस्तरीय सागरतट व्यवस्थापन समिती मालगुंड, अध्यक्ष, सदस्य सचिव व कमिटी मेंबर्स यांनी खूप मेहनत केलेली दिसून येते. या कमिटीने वार्षिक आराखड्यानुसार कामे केली आहेत.

चेंजिंग रूम, टॉयलेट, बाथरूम, वॉच टॉवर, लाईफ सेव्हिंग साहित्य, बैठका, लाईफ गार्ड, डंपिंग ग्राऊंड जागा, गझिबो, लाईफ जॅकेट, तसेच स्वच्छता अभियान, कौशल्य विकासात्मक प्रशिक्षण, धूपप्रतिबंधक झाडे लावणे, असे उपक्रम किनाऱ्यावर राबविले आहेत. कडाक्‍याच्या उन्हामध्ये पर्यटकांना बसण्यासाठी शॅकस्‌ची निर्मिती करण्यात आली आहे. बांबूपासून बनविलेल्या या झोपड्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण राहणार आहेत. त्यावर ग्रामपंचायतींचे नियंत्रण आहे. निर्मल सागरतट अभियानांतर्गत होणाऱ्या स्पर्धेसाठी मालगुंड किनारा परिपूर्ण सज्ज झाला आहे. 

किनारे स्वच्छ करतानाच पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून झाला आहे. त्यासाठी शासनाने ग्रामपंचायतींना निधी दिला आहे. त्यावर मेरीटाईम बोर्डाचे नियंत्रण राहणार आहे. 
- कॅ. संजय उगलमुगले, प्रादेशिक बंदर अधिकारी

Web Title: Malgund beach ready to welcome tourists this summer