कुपोषित बालकांची संख्या रायगडमध्ये वाढली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

अलिबाग : नोव्हेंबरमध्ये केलेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यात एक हजार 275 कुपोषित बालके आढळून आली आहेत. जुलैमधील पाहणीत ही संख्या एक हजार 220 होती. लाखो-कोटी रुपये खर्च करूनही कुपोषणाची तीव्रता कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे दिसते.

रायगड जिल्ह्यात चार महिन्यांत जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याऐवजी 55ने वाढल्याचे वास्तव समोर आले आहे. कुपोषण रोखण्यासाठी राबवल्या जात असलेल्या विविध योजना, खर्च होणारा कोट्यवधींचा निधी, मंत्री-अधिकारी-लोकप्रतिनिधींचे दौरे यावरच प्रश्‍नचिन्ह लागले आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभाग; तसेच आरोग्य विभागाकडून सहा वर्षांपर्यंतच्या बालकांची तपासणी करण्यात येते. या तपासणी अहवालानुसार जिल्ह्यातील कुपोषणाचा आलेख वाढत आहे.

Web Title: malnutritioned children number risen