नितेश राणे न्यायालयात हजर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

मालवण - बांगडाफेक आंदोलन प्रकरणातील संशयित आमदार नितेश राणे यांच्यासह 29 जण मंगळवारी सकाळी येथील पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्यावर अटकेची कारवाई करत कुडाळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांची प्रत्येकी सात हजारांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.

या आंदोलनातील आणखी काही संशयितांवर अटकेची कारवाई होणार असल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी या वेळी स्पष्ट केले. येथील समुद्रात अनधिकृत मिनी व पर्ससिनेटची मासेमारी सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसचे पदाधिकारी तसेच देवगड येथील मच्छीमारांनी येथील सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात 6 जुलैला आंदोलन केले होते. या आंदोलनात आमदार राणे यांनी सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रदीप वस्त यांच्यावर बांगडा मासा फेकून मारला होता. वस्त यांनी येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आमदार राणे यांच्यासह शंभर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: malvan konkan news nitesh rane present in court