यंत्राद्वारे मासेमारी; पाच पातींवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

मालवण - मासेमारी बंदी कालावधी सुरू असतानाही समुद्रात सुरू असलेल्या अनधिकृत मासेमारीविरोधात मत्स्य व्यवसाय विभागाने कडक पावले उचलण्यास सुरवात केली आहे. यात आज यंत्राचा वापर करून मासेमारी करणाऱ्या पारंपरिक मच्छीमारांच्या काही पाती मत्स्य व्यवसायाच्या अधिकाऱ्यांनी पकडल्या. मत्स्य व्यवसायाच्या या धडक मोहिमेमुळे अनधिकृतरीत्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत. यासंदर्भात मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

सध्या मासेमारी बंदी कालावधी सुरू आहे. यात जिल्ह्याच्या सागरी हद्दीत अनधिकृतरीत्या मासेमारी सुरू आहे. या अनधिकृत मासेमारीविरोधात काँग्रेसने येथील सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयात धडक देत आयुक्तांना घेराओ घालत जाब विचारण्यात आला होता. या आंदोलनात मत्स्य व्यवसाय आयुक्तांनी अनधिकृत मासेमारीविरोधात कडक कारवाई केली जाईल असे लेखी आश्‍वासन आमदार नीतेश राणे यांना दिले होते. मासेमारी बंदी असली तरी पारंपरिक मच्छीमारांना यात मुभा आहे; मात्र मासेमारी करताना नौकेस यंत्राचा वापर न करण्याचे बंधन आहे असे असतानाही येथील काही मच्छीमार आपल्या पातींना यंत्र लावून मासेमारीस जात असल्याच्या तक्रारी मत्स्य व्यवसाय विभागाकडे झाल्याने मत्स्य व्यवसायचे परवाना अधिकारी संतोष देसाई यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी दांडी येथील काही मच्छीमारांच्या पातीवर कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. या पातींना यंत्र बसविल्याचे आढळून आल्यानेच ही कारवाई करण्यात आली. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या या कारवाईमुळे अनधिकृतरीत्या मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. १ ऑगस्टपासून नव्या मासेमारी हंगामाची सुरवात होणार आहे. 

काल सकाळी दांडी येथे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच पातींवर कारवाई केल्याची माहिती मिळाली. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आला; मात्र तो बंद असल्याने कारवाईची सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

Web Title: malvan news konkan news fish