मोटार ओहोळात कोसळून बांद्यातील व्यावसायिक ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

जीवदान देणाऱ्यावरच काळाचा घाला
मोटे पोहण्यात पारंगत होते. अनेकांना त्यांनी बुडताना वाचविले आहे तर अनेकवेळा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोटे यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. अनेकांना जीवदान देणाऱ्यावरच आज काळाने घाला घातला.

बांदा ः बांदा-लकरकोट येथे ताबा सुटल्याने मोटार ओहोळात कोसळून एकजण ठार झाला. अविनाश कालिदास मोटे (वय 50, रा. रामनगर-बांदा) असे मृताचे नाव आहे. ही घटना काल रात्री दहाच्या सुमारास घडली. मोटार सुमारे 50 फूट फरफटत गेल्याने यात चालकाच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाली. याबाबतची नोद बांदा पोलिसात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी ः रात्री दहाच्या सुमारास अविनाश मोटे आपल्या ताब्यातील मोटार (जीए 06 डी 1079) घेऊन आपल्या घरी रामनगर येथे जात होते. येथील पत्रादेवी येथे आले असता त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने मोटार सुमारे 50 फूट फरफटत जात ओहोळात कोसळली. यात अपघातात मोटे मोटारीत अडकून पडले. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र मोटार ओहोळातील झाडीत अडकल्याने मोटारीचा शोध घेण्यास थोडा वेळ लागला. वाहनाच्या दिव्याच्या प्रकाशामुळे ते नजरेस पडले. येथील युवकांनी अपघातग्रस्तास मोटारीमधून बाहेर काढले. त्यांना रुग्णवाहिकेने उपचारासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले; मात्र चालक मोटे वाहनात अडकून पडल्याने तसेच त्यांच्या डोक्‍यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी जगदीश पाटील यांनी त्यांना मृत घोषित केले.

शवविच्छेदन करून आज सकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. श्री. मोटे यांचे फॅब्रिकेशनचे दुकान आहे.

जीवदान देणाऱ्यावरच काळाचा घाला
मोटे पोहण्यात पारंगत होते. अनेकांना त्यांनी बुडताना वाचविले आहे तर अनेकवेळा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी मोटे यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. अनेकांना जीवदान देणाऱ्यावरच आज काळाने घाला घातला.

Web Title: a man killed as a car drowns in water