मित्राच्या वडिलांनीच तिचा काढला काटा

crime
crime

देवरूख : मोगरवणे येथे सापडलेल्या तरुणीच्या मृतदेह प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत छडा लावत देवरूख पोलिसांनी खून करणाऱ्या व्यक्‍तीच्या मुसक्‍या आवळल्या. ज्या मुलीचा खून झाला तिच्या मित्राच्या वडिलांनीच तिचा काटा काढल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

विशाखा अजय महाडिक असे या दुर्दैवी तरुणीचे नाव असून सुनील रामचंद्र गुरव (47, कसबा) संशयिताचे नाव आहे. सुनील याचा मुलगा आणि विशाखाची मैत्री होती. ही मैत्री सुनीलला मान्य नव्हती. याच रागातून संधी साधत सुनीलने तिचा खून केल्याचे कबूल केले. 

26 डिसेंबरला देवरूखजवळच्या मोगरवणे येथील काजू बागेत अज्ञात तरुणीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला. संगमेश्‍वरातून 1 डिसेंबरपासून बेपत्ता असलेल्या विशाखाच्या आई-वडिलांना बोलावण्यात आले. त्यांनी मृतदेह आपल्या मुलीचा असल्याचे सांगितले. तिचा खून झाला आहे असे ठामपणे सांगितले. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. तिच्या मित्रमैत्रीणींची चौकशी केल्यावर महेंद्र गुरव या मुलाशी तिची मैत्री असल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्या युवकाभोवती चक्रे फिरवली. ज्या दिवसापासून ती बेपत्ता होती त्या काळात सुनील गुरव गावाला आल्याचे कळल्यानंतर पोलिसांनी त्यावर लक्ष केंद्रित केले. शुक्रवारी त्याला मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. शनिवारी संध्याकाळी उशिरापर्यंत त्याची गावात आणून चौकशी सुरू होती. या चौकशीत विसंगत उत्तरे मिळत असल्याने पोलिसी खाक्‍या दाखवल्यानंतर सुनीलने आपणच तिला मारल्याची कबुली दिली. काल संध्याकाळी अटक करून त्याला देवरूख न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

या खून प्रकरणाची उकल करण्यात परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे, देवरूखचे पोलिस निरीक्षक शिवाजी पाटील, उपनिरीक्षक संग्राम पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. 

आणखी काही जणांचा सहभाग? 
खून प्रकरणातील मुख्य आरोपी सापडला असला तरी हे कृत्य करण्यात आणखी काही जणांचा हात होता का? खून कुठे झाला? कसब्यातील युवती देवरूखात कशी आली? याबाबत पोलिस तपास करीत आहेत. प्राथमिक तपासात या खुनात महेंद्र गुरव याचा कोणताच संबंध नसल्याचे पुढे आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com