मंडणगडात धरणांच्या पातळीत घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

मंडणगड - मार्चअखेर व एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच वातावरणातील उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तालुक्‍यातील नदी, ओढे, नाल्यामधील पाणी आटू लागले आहे. तालुक्‍यातील चिंचाळी, तुळशी, पंदेरी धरणातील पाणी पातळी खालावली आहे. अनेक ठिकाणी विहिरींच्या पाण्याचे स्रोत बंद झाल्याने यावर्षी तालुक्‍याला पाणीटंचाईची झळ पुढील आठवड्यापासूनच बसण्याची शक्‍यता आहे.

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उष्मा वाढला होता. तालुक्‍यातील तापमान किमान २५ अंश व कमाल ३५ अंश इतके आहे. कमाल तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्याचा मोठा प्रवाह असणाऱ्या भारजा नदीत पाणी आहे; परंतु सखल भाग सोडला तर उंच भागात काही ठिकाणी पात्र आटले आहे. पिण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विहिरींचे स्रोत आटू लागल्याने पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. शहर परिसरात काही प्रभागात याची झळ तीव्रतेने जाणवत आहे. तालुक्‍यात मात्र टंचाईच्या झळा जनावरांना बसत असून पाण्याच्या शोधात जनावरे फिरताना दिसत आहेत.

तालुक्‍यात लघुपाटबंधारे खात्यामार्फत चिंचाळी, तुळशी, पंदेरी, भोळवली धरणे बांधण्यात आली. या धरणांची पाण्याची पातळी मार्च महिन्यातच मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. पावसाळा सुरू होण्यास अजून अडीच ते तीन महिन्यांचा  कालावधी शिल्लक असताना निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे चिंता वाढली आहे. कृषी विभागामार्फत पावसाळा संपता संपता नदी, नाल्यांवर बंधारे बांधले जातात; मात्र पाणी साठून ते सर्रास फुटून जातात. असे बंधारे केवळ आकडेवारी दाखविण्यापुरते मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे जलसंधारणाचे काम योग्य पद्धतीने होण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे अत्यावश्‍यक आहे. यावर्षी लवकर सुरू झालेल्या टंचाईच्या झळांमुळे ही बाब अधोरेखित झाली आहे.

२८५१६
२) rat४p१३.jpg - तुळशी धरणातील खालावलेली पाणी पातळी. (सचिन माळी : सकाळ छायाचित्रसेवा)

Web Title: mandangad dam water lavel decrease