कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

मंडणगड - तालुक्‍यातील वेरळ तर्फे नातूनगर या गावातील शेतकऱ्याने बॅंकेचे पीककर्ज फेडता न आल्याने घराच्या छपराला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुद्धदास लक्ष्मण साळवी (वय 58) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. साळवी यांनी बॅंकेचे कर्ज काढले होते; मात्र त्या कर्जाचे हप्ते वेळेवर फेडता येत नसल्याने ते अस्वस्थ होते. यामुळे त्यांनी मंगळवार रात्री दोननंतर ते बुधवार सकाळी 6 वाजण्याच्या कालावधीत राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

शेतकऱ्याची आत्महत्या करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. या संदर्भात त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार बुद्धदास साळवी यांनी तालुक्‍यातील बॅंक ऑफ इंडियाकडून एक लाख रुपयांचे पीककर्ज घेतले होते; मात्र या कर्जाचे हप्ते त्यांना वेळच्या वेळी भरता येत नव्हते. बॅंकेकडून कर्ज वसुलीचा तगादा लागला होता.

Web Title: mandangad konkan farmer suicide