नाम फाऊंडेशनकडून शहीद राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

सचिन माळी
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

मंडणगड - अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचविताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाची नाम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जांभूळनगर येथील घरी जात भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या नामकडून वीरमाता राधाबाई गुजर यांना मदतीचा अडीच लाखांचा धनादेश देण्यात आला.

मंडणगड - अरुणाचल प्रदेश येथे पूरग्रस्तांना वाचविताना शहीद झालेल्या राजेंद्र गुजर यांच्या कुटुंबाची नाम फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जांभूळनगर येथील घरी जात भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या नामकडून वीरमाता राधाबाई गुजर यांना मदतीचा अडीच लाखांचा धनादेश देण्यात आला.

अरुणाचल प्रदेशमध्ये पूरग्रस्तांना मदत करीत असताना ४ जुलै रोजी भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर अपघातग्रस्त झाले. त्यात राजेंद्र गुजर यांना वीर मरण आले. सोमवार ता.१४ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नाम फाऊंडेशच्या प्रतिनिधींनी कुटुंबियांची भेट घेतली. शहीद राजेंद्र गुजर यांना श्रद्धांजली वाहिल्यांतर मदतीचा धनादेश गुजर यांच्या मातोश्री राधाबाई गुजर व वडील निवृत्त मेजर यशवंत गुजर यांना देण्यात आला. त्यानंतर नामच्या विविध समाजउपयोगी उपक्रमांची माहिती देण्यात आली. यावेळी नामचे कोकण समन्वयक समीर जानवळकर यांनी नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी सुरु केलेले नाम फाऊंडेशन हे भारतीय जवान व शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे सांगत फाऊंडेशनच्या माध्यमातून जांभूळनगर येथे काही उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी चिपळूण तालुका समन्वयक रमण डांगे, संगमेश्वर तालुका समन्वयक भगवतीसिंह चुंडावंत, दापोली तालुका समन्वयक योगेश पिंपळे, समीर तलाठी, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माणिक कदम, माजी सैनिक नवनाथ साळवी, संघटक रवींद्र इथापे, उपसभापती स्नेहल सकपाळ, सरपंच सुशीला गुजर, उपसरपंच अभिजित कळकीकर, शशिकांत गुजर, नवनीत मपारा, रघुनाथ जोशी, सचिन सकपाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

माझा ' राजू ' म्हणत आईचा हुंदका कायम
शहीद राजेंद्र गुजर यांची आई राधाबाई पुत्र वियोगाच्या धक्क्यातून अजूनही सावरलेल्या नाहीत. सांत्वन करण्यासाठी आलेल्या नामच्या पदाधिकाऱ्यांसमोर आपल्या तरुण मुलाच्या आठवणीने दुःख अनावर झाल्याने आईने आक्रोश केला. त्यामुळे उपस्थितांनाही गहिवरून आले.

Web Title: mandangad konkan news naam foundation help to martyr rajendra gujar family