माणगाव-ढोलकरवाडीतील "ती' जागा स्मशानभूमीसाठी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

माणगाव - माणगाव ढोलकरवाडी येथील लोकांना सार्वजनिक स्मशानभूमी नसल्याने गैरसोय होत होती. येथील चाळीस ते पन्नास कुटुंबीयांनी लोकवर्गणीतून सर्व्हे नं. 139 येथील 2 गुंठे जमीन खरेदी केली होती; मात्र या जमिनीलगत जमीनमालकांनी अंत्यविधीसाठी अटकाव केल्यामुळे हा विषय वादग्रस्त बनला होता; मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी या जमिनीबाबत चौकशी करून जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची ठरवून सार्वजनिक स्मशानभूमीसाठी वापरण्याबाबतचा निर्णय नुकताच दिला. 

माणगाव ढोलकरवाडी येथील सर्व्हे नं. 139 हि.नं. 39 या दोन गुंठे जमिनीत सार्वजनिक स्मशानभूमी व्हावी म्हणून लोकांची मागणी होती. या जमिनीसाठी लोकवर्गणी काढून जमीन खरेदी करण्यात आली होती; मात्र जमिनीलगत जमीनमालकांनी सार्वजनिक स्मशानभूमीसाठी हरकत घेतली. त्यामुळे ढोलकरवाडी येथील ग्रामस्थांची गैरसोय होत होती. 

याबाबत सुदाम दत्ताराम राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देऊन ग्रामस्थांसाठी स्मशानभूमीचे क्षेत्र खुले करण्याची विनंती केली होती. यामुळे चौकशी होऊन जमीन ग्रामपंचायतीच्या मालकीची ठरविण्यात आली. सोमवारी ग्रामपंचायतीतर्फे तसा फलकही लावण्यात आला असून ढोलकरवाडी ग्रामस्थांची गैरसोय कायमस्वरूपी दूर झाली आहे. या जमिनीसंदर्भातील फलक सरपंच सौ. लक्ष्मी केसरकर, उपसरपंच सचिन परब, ग्रामपंचायत सदस्य दीपक काणेकर, रुपाजी धुरी, नाना आंबेरकर, ग्रामविकास अधिकारी अमोल भिसे, सौ. लक्ष्मी धुरी, सौ. पेडणेकर, सौ. आडेलकर, जोसेफ डॉन्टस, सुदाम राणे, सुनील इब्रामपूरकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Mangaon graveyard issue