लैंगिक अत्याचारप्रकरणी पित्यास आजन्म कारावास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 मे 2017

माणगाव (जि. रायगड) - तळा तालुक्‍यातील भानंग गावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने तिच्या पित्यास आजन्म कारावास; तसेच "पोक्‍सो' कायद्यानुसार दहा वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सत्र न्यायाधीश माणगाव रा. ना. सरदेसाई यांनी गुरुवारी (ता. 25) हा निकाल दिला. या प्रकरणातील आरोपी पित्यास दोषी ठरवण्यात आले आहे. भानंग गावातील या आरोपीने आपल्या 14 वर्षांच्या मुलीवर जबरदस्तीने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार होती. यातून तिला गर्भधारणा झाली होती. या नराधमाने पत्नी घरात असताना रात्री या मुलीचे तोंड दाबून लैंगिक अत्याचार केला होता. कुणालाही सांगू नको, अशी धमकीही तिला दिली होती. दुसऱ्या दिवशी मुलीने आईला हा प्रकार सांगितला होता. यानंतरही त्याच्याकडून अत्याचार सुरूच राहिला. पत्नीने जाब विचारल्यावर तो पत्नीला व मुलीला मारहाण करीत असे. मुलीला गर्भधारणा झाल्याने तिला गर्भपातासाठी मुंबईतील कामा रुग्णालयात दाखल करून आरोपी पळून गेला होता. पीडित मुलीने आझादनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

Web Title: mangav konkan news crime