अवकाळी पावसामुळे आंबा संकटात

भूषण आरोसकर
बुधवार, 17 मे 2017

दर घसरले - १० टक्के आंबा शिल्लक; फळमाशीच्या प्रादुर्भावाची शक्‍यता

सावंतवाडी - शिल्लक राहिलेला १० टक्के आंबा अवकाळीच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळीसदृश स्थिती काही आंबा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तयार झालेला आंबा कॅनिंगला देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे बाजारपेठेतील आंब्याचे दर उतरणीला लागले आहेत.

दर घसरले - १० टक्के आंबा शिल्लक; फळमाशीच्या प्रादुर्भावाची शक्‍यता

सावंतवाडी - शिल्लक राहिलेला १० टक्के आंबा अवकाळीच्या विळख्यात सापडला आहे. पावसाळीसदृश स्थिती काही आंबा पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यताही वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे तयार झालेला आंबा कॅनिंगला देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. अवकाळी पावसामुळे बाजारपेठेतील आंब्याचे दर उतरणीला लागले आहेत.

गेल्या आठवड्यात व काल जोरदार वादळीसदृश अवकाळी पाऊस झाला. यामुळे बऱ्याच ठिकाणचा झाडावर उरलेला आंबा अडचणीत सापडला आहे. एरवी आंब्याला साधारणतः दमट हवामानाची आवश्‍यकता असते. त्यात अचानक कोसळलेल्या या पावसामुळे आंबापिक धोक्‍यात आले आहे. सध्या जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात फळधारणा झालेला १० टक्के आंबा झाडावर शिल्लक राहिला आहे. 

दरम्यान झालेल्या पावसामुळे हा आंबा अवकाळीच्या विळख्यात सापडल्यागत जमा आहे. पाऊस व त्यानंतर निर्माण होणारी पावसाळीसदृश स्थिती या आंबा पिकाला फळमाशी रोग निर्माण करण्यास पूरक ठरणार आहे. ढगाळ वातावरण राहिल्यास ही शक्‍यता वाढणार आहे. अवकाळी झालेल्या पावसामुळे आधीच कृषी विभाग, फळसंशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आणि शेतकरी वर्गातून आंब्याची प्रत घसरल्यास त्याला बाजारपेठेत अत्यल्प दर मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला जात होता. त्यानुसार ठिकठिकाणच्या बाजारपेठेतील दरांच्या उतरणीला सुरवात झाली आहे. पाऊस पडण्याआधी प्रतीडझन जो आंबा २५० ते ४०० रुपये होता तो आता सर्वसाधारणपणे सरासरी १५० पासून उपलब्ध होत आहे. या सावंतवाडीत २०० ते २५० रुपये, वेंगुर्ले १५० ते २५० रुपये तर देवगड ३०० ते ३५० रुपये सरासरी आंबा विक्री केली जात आहे. यंदा सुरवातीला चांगले दर या आंब्याला मिळाले तरी अवकाळी पावसाने आंब्याच्या या उत्पादनावर विरजण टाकले आहे. मुंबई बाजारपेठेतही येथील आंबा पेटीला ५०० पासून १००० रुपयापर्यंत दर होता. त्यात हमाली खर्च, वाहतुक खर्च व इतर बरेच खर्चातून फारसा फायदा आंबा उत्पादकांना जिल्ह्यातील उत्पादकांना होत नाही. अशात अवकाळी पावसाचे संकट व फळमाशी आंब्याचे उत्पादन कमी करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. 
 

अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडलेला हा आंबा फुकट घालवण्यापेक्षा लवकरात लवकर कॅनिंगला देणे योग्य ठरेल. पुन्हा सलग पाऊस झाल्यास फळमाशी होण्यास अधिक वेळ लागणार नाही. तिसऱ्या मोहोराच्या टप्यातील काहीसा आंबा अद्यापही शिल्लक आहे.
- बी. एन. सावंत, शास्त्रज्ञ विस्तार वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील एकुण असलेल्या ३१ हजार हेक्‍टर क्षेत्रापैकी दोन तीन कोसळलेल्या पावसात नुकसानीने ५ हजार हेक्‍टर क्षेत्र प्रभावित झाले आहे.े त्याचे पंचनामे अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले आहेत.
- अरुण नातू, कृषी तंत्र सांख्यिकी अधिकारी 

Web Title: mango disaster by aborted rain