रत्नागिरी : पाच-सहा डझनचे फळ पेटीला, उर्वरित कॅनिंगला

हापूस आंब्याची स्थिती; सामान्यांच्या आवाक्यात, आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम
Mango market price increase season
Mango market price increase season sakal

रत्नागिरी: बागायतदारांच्या अंदाजानुसार शेवटच्या टप्प्यात हापूसची आवक वाढली असून दरात घट झाली आहे. सर्वसामान्यांना परवडेल, असे फळ मिळत असल्यामुळे बाजारामध्ये आर्थिक उलाढाल वाढली आहे. पाच, सहा डझनचे फळ बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असून छोटी आणि डागी फळं कॅनिंगला दिली जात आहे. उत्पादन कमी असल्याने कॅनिंगचा दर सर्वसाधारण किलोला ३४ रुपयांपर्यंत मिळत आहे.

एप्रिलनंतर तिसऱ्‍या मोहराचे उत्पादन वाढेल, असा अंदाज अक्षयतृतेया दरम्यानच वर्तवला होता. त्यानुसार उत्पादनात वाढ झाली असून मागणीही घटली आहे. त्यामुळे १ डझन आंब्यासाठी ग्राहकांना १ हजारांहून अधिक रुपये मोजावे लागत होते. पण आता आवक वाढल्याने डझनभर आंब्यासाठी १५० ते ४०० रुपयेच मोजावे लागत आहेत. हंगामाच्या अंतिम टप्प्यात का होईना, सर्वसामान्यांना हापूस आंब्याची चव चाखायला मिळतेय, हे महत्वाचे. शिवाय दर कमी झाल्याने कोकणातील आंबा उत्पादकांनी माल मार्केटमध्ये पाठवण्याऐवजी जागेवरच कंपन्यांना विकण्यास प्राधान्य दिले.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबई मार्केटमध्ये हापूसची आवक सुरु झाली होती. त्यानुसार दिवसाकाठी ९० हजार पेट्यांची आवक सुरु होती. मात्र, पुरवठा अधिक आणि मागणी कमी, अशी अवस्था झाल्याने दर घटले आहेत. काही दिवसांपूर्वी हापूसची एक पेटी ही ३ हजार ५०० रुपयांपर्यंत विकली जात होती. आता आवक वाढल्याने हीच पेटी १ हजार ते २ हजार रुपयांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे वाहतूकीचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्‍यांनी थेट ज्यूस बनवणाऱ्‍या कंपन्यांना जागेवर आंबा विक्रीला प्राधान्य दिले आहे.

एक नजर..

  • १ डझनसाठी मोजावे लागत होतेः १ हजारांहून अधिक

  • आवक वाढल्याने डझनभर आंब्यासाठीः १५० ते ४०० रुपये

  • दुबई येथील मार्केट १ डझन आंबा मिळतोः ५४० रुपयांना

  • आंबा निर्यातीसाठी मोजावे लागताहेतः ६६० रुपये

  • निर्यातीवर परिणाम

निर्यातीमधून आंबा उत्पादकांना अधिकचा फायदा होत होता, पण दुबईतील दर एवढे घसरले आहेत की येथील दरापेक्षा वाहतूकीलाच अधिक खर्च येत आहे. दुबई येथील मार्केटमध्ये १ डझन आंबा ५४० रुपयांना मिळतो तर तोच आंबा निर्यातीसाठी ६६० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी तोटा सहन करु शकत नाहीत. त्यामुळे कोकणातून होणाऱ्फ‍या निर्यातीवर परिणाम झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com