रायगड बाजारात आंब्याची आवक वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

रायगड बाजारामध्ये आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग; तसेच अलिबाग-रायगड येथून दररोज सरासरी 600 ते 900 पेट्या दाखल होत असल्यामुळे आंब्याचे दर 40 ते 50 टक्‍क्‍यांनी घसरल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

पनवेल - येथील रायगड बाजारामध्ये आंब्याची आवक वाढली आहे. रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग; तसेच अलिबाग-रायगड येथून दररोज सरासरी 600 ते 900 पेट्या दाखल होत असल्यामुळे आंब्याचे दर 40 ते 50 टक्‍क्‍यांनी घसरल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. कोकणातील रत्नागिरी, देवगड, मालवण; तसेच अलिबाग, रायगड येथील हापूस हा ऑक्‍टोबर महिन्यापासून बाजारामध्ये उपलब्ध होता. पण दर जास्त असल्याने दर कमी होण्याच्या प्रतीक्षेत नागरिक होते. अखेर आवक वाढल्याने आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mango Raigad market