इन्सुलीत चौदा एकरांतील बागायतीला आग, कलमे खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जानेवारी 2017

बांदा - इन्सुली-माडभाकर येथील शेतकरी लक्ष्मण भदू पोपकर यांच्या सुमारे 14 एकर बागायतीला आग लागली. दुपारी लागलेल्या आगीत आंबा, काजू, नारळ व अन्य झाडे जळून खाक झाली. ऐन पीक हंगामात बागायतीला आग लागल्याने पोपकर यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. कोणीतरी अज्ञाताने आग लावली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महसूल व कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यात अडीच लाखांच्या नुकसानीची नोंद आहे.

याबाबत अधिक माहिती अशी ः इन्सुली क्षेत्रफळ येथील शेतकरी लक्ष्मण पोपकर, रघुनाथ पोपकर, झिलू पोपकर व गोकुळदास पोपकर यांची बागायती आहे. त्यांनी सुमारे 14 एकर जमिनीमध्ये आंबा, काजू, माड व फणस अशी अनेक प्रकारची झाडांची लागवड केली आहे. दुपारी अज्ञाताने या बागायतीला आग लावली. आग लागल्याचे वृत्त समजताच पोपकर व त्यांच्या शेजाऱ्यांनी आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. आग विझविण्यासाठी अडचण येत होती. आगीचा भडका वाढतच होता. आगीत सुमारे 100 आंबा, 90 काजू कलमे व 20 नारळाची झाडे जळून खाक झाली. परिणामी वर्षभराची मेहनत क्षणात नाहीशी झाली. त्यामुळे पोपकर यांच्यावर संकट कोसळले आहे.

आग विझविण्यासाठी गणपत राणे, गीता पोपकर, उर्मिला पोपकर, राघोबा पोपकर यांनी शर्थीचे प्रयत्न केले. याबाबतची माहिती इन्सुलीत मिळताच उपसरपंच कृष्णा सावंत, तलाठी भारती गोरे, कृषी सहायक प्रिया सावंत यांनी घटनेचा पंचनामा केला.

Web Title: mango tree damage in sindhudurg district