मनसंतोष गड ट्रेकिंग अडचणींवर शोधला मार्ग

दुर्ग मावळा प्रतिष्ठानचा पुढाकार; दुर्गप्रेमींसाठी लवकरच ट्रेकिंगचे आयोजन
Mansantoshgad
Mansantoshgad sakal

सावंतवाडी : मनसंतोष गडावर चढाई करताना दुर्गप्रेमींची होणारी अडचण लक्षात घेऊन दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग टीम प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या वेळी प्रात्यक्षिकही करून समस्या लक्षात घेण्यात आल्या. लवकरच सर्व पूर्वतयारी करून दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागामार्फत मनसंतोष गडावर चढाई करण्यासाठी ट्रेकिंग कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दुर्गप्रेमी मनोहर मनसंतोष गडावर भ्रमंती करायला जातात; परंतु त्यांना मनोहर गडावरूनच परतावे लागते. कारण मनसंतोष गडावर चढताना सुरुवातीच्या दोन टप्प्यांवरील पायऱ्या सुस्थितीत आहेत. त्यापुढील टप्प्यांवरील तीन चार पायऱ्या वगळता सर्व पायऱ्या कोसळलेल्या आहेत. सुस्थितीत असलेल्या पायऱ्यांवर दगड - माती साचलेली असल्याने या गडावर चढण्यासाठी आपल्याला रोप लावूनच चढणे आवश्यक आहे. प्रशिक्षित व्यक्तींच्या मार्गदर्शनाखालीच मनसंतोष गडावरील चढाई करणे सुरक्षित आहे. कारण डाव्या बाजूस खोल दरी आहे. एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते. या अडचणींमुळे तसेच काही दुर्गप्रेमींना या गडाबाबत माहिती नसल्याने दुर्गप्रेमी मनोहर गडावर भ्रमंती करून मागे फिरतात. मनसंतोष गडावर येणाऱ्या दुर्गप्रेमींपैकी अवघे एक ते दोन टक्केच मनसंतोष गडाची चढाई करतात.

दुर्गप्रेमींची अडचण होणार दूर

दुर्गप्रेमींची अडचण दूर करण्यासाठी नुकतेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग टीम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसंतोष गडावर जाणाऱ्या मार्गावरील चढाई सोपी करण्यासाठी पेग व बोल्टिंगच्या आवश्यक जागांची पाहणी करण्यात आली. आवश्यक साहित्याच्या सहाय्याने सर्व टीमने मनसंतोष गडावर यशस्वी चढाई केली. चढाई करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी चर्चा झाली. लवकरच सर्व पूर्वतयारी करून मनसंतोष गडावर जाण्याची इच्छा असणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी ट्रेकिंगचे प्रतिष्ठानतर्फे आयोजन केले जाणार आहे. या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग अध्यक्ष गणेश नाईक, ट्रेकिंग मार्गदर्शक प्रसाद सावंत, मनोहर मनसंतोष गडसंवर्धन प्रमुख रोहन राऊळ, नीतेश घावरे, तेजस भरडे, किशोर परब सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com