कणकवलीत कचऱ्यापासून खतनिर्मिती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

कणकवली - येथील नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी शासनाने १ कोटी १९ लाख ८५ हजाराचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून दररोज ५ टन कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मिती होणार आहे. याखेरीज जेबीसी मशिन, गारबेज डेपोचे बंदिस्तीकरण आदी कामे होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी दिली.

शहरात खासगी कंपनीच्या माध्यमातून ९०० कोटींचा प्रकल्प साकारत आहे; मात्र या प्रकल्पात काही समस्या निर्माण झाली. गारबेज डेपोत कचराकोंडी निर्माण होऊ नये यासाठी नगरपंचायतीने स्वतंत्ररीत्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा आराखडा तयार केला होता. त्याला राज्यशासनाने मंजूरी दिली असून निधीही मंजूर केला आहे.

\प्रकल्पामध्ये दररोज ५ टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारी आणि त्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणारी कंपोस्टींग मशिन खरेदी केली जाणार आहे. तर गारबेज डेपोमध्ये कचरा संकलन व इतर कामांसाठी जेबीसी मशिनही खरेदी केली जाणार आहे. कचरा प्रकल्पामध्ये भटकी जनावरे तसेच भंगार गोळा करणाऱ्यांचा शिरकाव रोखण्यासाठी प्रकल्पाच्या भोवताली लोखंडी जाळी बसवली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या एकूण रकमेपैकी ४१ टक्‍के रक्‍कम नगरपंचायत तर उर्वरित रक्‍कम शासन खर्च करणार आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत ही कामे होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी उकिर्डे यांनी दिली.

नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पामध्ये गांडुळ खतासाठी गांडुळ खताचे ताडपत्री डोमचे १२ डोम तयार केले असून, ते कार्यान्वित केले आहेत. उर्वरित पक्‍के चिरेबंदी डोम बांधण्यात येणार असून, एकाच वेळी मोठ्या प्रमाणात गांडुळ खत निर्मिती सुरू होणार आहे. याखेरीज गार्बेज डेपोमध्ये टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यापासून दुर्गंधी पसरू नये, म्हणून त्यावर विशिष्ट प्रकारचे लिक्‍विड फवारणी केली असून, त्यापासून जमिनीला किंवा कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या जिवाणूंना बाधा होणार नसल्याचे उकिर्डे यांनी स्पष्ट केले.

नगरपंचायतीचा घनकचरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न निकाली लागणार आहे. शहरात दररोज ७ टन कचरा गोळा होतो. यापैकी ५ टन कचरा खतनिर्मितीसाठी वापरला जाणार आहे. त्यामधून नगरपंचायतीला आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे.
- मनोज उकिर्डे,
 मुख्याधिकारी, कणकवली नगरपंचायत

Web Title: Manufacturing of organic fertilizer from waste