सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त

अमित गवळे 
बुधवार, 9 जानेवारी 2019

पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे.

पाली - सुधागड तालुका कृषी विभागात अनेक पदे रिक्त आहे. त्यामध्ये कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक लिपीक व वाहन चालक अशा विविध जागांचा समावेश आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी असलेल्या योजना राबवितांना व शेतकऱ्यांपर्यंत पोहचवितांना अनेक अडचणींना समोरे जावे लागत आहे.

तालुका कृषी विभागात कृषी अधिकार्यांची ३ पदे मंजुर आहेत. त्यातील पाली कृषी कार्यालयातील कृषी अधिकार्याचे १ पद रिक्त आहे. पर्यवेक्षकाची ५ पदे मंजुर असुन २ पदे रिक्त आहेत. कृषी सहाय्यकांची २४ पदे मंजुर असून ३ पदे रिक्त आहेत. लिपिकाची ४ पदे मंजुर आहेत. त्यातील २ पदे रिक्त आहेत तर १ विरिष्ठ लिपिक सदाभाऊ खोत यांच्या इथे मागणीनुसार दिड वर्षापासून कामगीरीवर गेले आहेत. परिणामी एका लिपीकावर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. तसेच या कार्यालयासाठी असलेली गाडी वाहन चालक नसल्याने जुन २०१८ ला नेण्यात आली आहे. विविध जागा रिक्त असल्याने इतर अधिकारी व कर्मचार्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडतो. तसेच शेतकर्यांच्या कामाला दिरंगाई देखिल होत आहे.

कमी मनुष्यबळ असल्याने मोठ्या योजना राबवितांना अडचणी येतात. मात्र कोणाचीही गैरसोय होऊ देत नाही. रिक्त जागा लवकर भरण्यात याव्यात अशी तोंडी मागणी केली आहे.
- जे. बी. झगडे, तालुका कृषी अधिकारी, सुधागड-पाली

रिक्त जागांमुळे खरीप हंगामात सर्व अधिकारी व कर्मचार्यांची मोठी धावपळ होते. शेतक-याभिमूख कामे वेळत होत नाहित. जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे व यांत्रिकीकरण अशी मोठी अभियाने राबवितांना अडचणी येतात. कृषी विमा योजनांसाठी अधिक माणसांची गरज लागते. परिणामी या सर्व योजना, अभियाने व कामे करतांना अपुऱ्या मनुष्यबळामुळे मोठी गैरसोय होते. परिणामी बळिराजाचे देखिल नुकसान होते.

Web Title: Many posts are vacant in Sudhagad taluka agriculture department