मराठा समाजाचा 12 मे रोजी मेळावा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 एप्रिल 2019

कणकवली - मराठा क्रांती मोर्चासाठी एकत्र आलेल्या जिल्ह्यातील मराठा समाजाचा मेळावा 12 मे रोजी होणार आहे. यासाठी 5 मे रोजी नियोजनाची बैठक ओरोस येथील वसंत स्मृती सिडको विश्रामगृह हॉटेल चैतन्यजवळ सकाळी साडेदहा वाजता आयोजित केली आहे. 

या नियोजन बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.

बैठकीत यावर होणार चर्चा - 

  • शैक्षणिक वर्ष 2019 मध्ये येणाऱ्या संभाव्य अडचणी आणि त्यावर आवश्‍यक उपाय योजना करणे
  • अण्णासाहेब पाटील महामंडळ मधील योजनेचा लाभ तरुणाना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे
  • आरक्षण, बिंदूनामावलीमधील त्रुटी दुरुस्ती, योग्य जागा वाटप आणि त्यावर उच्च न्यायालयात रिट अर्ज दाखल करणे
  • कोपर्डीसह महिला सुरक्षेबाबत उपाययोजना करणे
  • तालुका निहाय मराठा समिती पुर्नरबांधणी आणि गावनिहाय समित्या बनवने याबाबत विचारविनिमय करणे
  • व्यवसाय आणि उद्योग मार्गदर्शन शिबिराबाबत नियोजन करणे
  • 12 तारखेला होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकी मधील भूमिका स्पष्ट करणे
  • शेतकरी समस्या आणि त्यावर उपाय तसेच शेतकरी गट निर्माण करुन त्यांना बाजारपेठ मिळवून  देणे
     
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranit Morcha Melava on 12 May in SIndhudurg