Maratha Kranti Morcha : सिंधुदुर्गात उत्स्फूर्त जेलभरो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्गात सकल मराठा समाजाच्या जेलभरोला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोडामार्गमध्ये तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रकार वगळता पुर्ण आंदोलन शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे. जिल्ह्यात काही भागात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.

दोडामार्ग येथे तहसिलदारांची गाडी जाळण्याचा प्रकार आज सकाळी उघड झाला. पार्क करून ठेवलेल्या गाडीच्या टायरला अज्ञाताने आग लावली. हा प्रकार वगळता अन्य कोठेही अनूचित प्रकार घडला नाही. मोर्चा काढून पोलिस ठाण्यात जात जेलभरो आंदोलन करण्यात आले. बहुसंख्य पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात हे आंदोलन झाले. एसटी प्रशासनाने आज नुकसानीच्या भीतीने गाड्या बंद ठेवल्या होत्या. यामुळे काही जण मोर्चात पोहोचू शकले नसल्याचेही चित्र होते. वैभववाडीसह जिल्ह्यातील काही भागात आज उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.

Web Title: Maratha Kranti Morcha agitation in Sindhudurg