'पेड आंदोलन' असा उल्लेख करणे हा मराठ्यांचा अपमान - नगराध्यक्ष साळगावकर

अमोल टेंबकर
बुधवार, 25 जुलै 2018

सावंतवाडी : मराठ्यांच्या आंदोलनाला 'पेड आंदोलन' असा उल्लेख करणे म्हणजे समस्त मराठ्यांचा अपमान आहे. समाजाची नाराजी लक्षात घेता शासनाने तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी असे आवाहन करीत शासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे असा प्रश्न सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज व्यक्त केली. 

सावंतवाडी : मराठ्यांच्या आंदोलनाला 'पेड आंदोलन' असा उल्लेख करणे म्हणजे समस्त मराठ्यांचा अपमान आहे. समाजाची नाराजी लक्षात घेता शासनाने तात्काळ योग्य ती भूमिका घ्यावी असे आवाहन करीत शासन आणखी किती बळी जाण्याची वाट पाहत आहे असा प्रश्न सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज व्यक्त केली. 

सकल मराठा सिंधुदुर्गच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा बंद आपला पाठिंबा आहे असे त्यांनी जाहीर केले. साळगावकर यांनी आज येथे आपली भूमिका मांडली ते म्हणाले, तलाकच्या निर्णयाबाबत ज्याप्रमाणे शासनाला निर्णय घ्यावा लागला तशीच परिस्थिती आज मराठा समाजाच्या बाबतीत झाली आहे. समाजाची मागणी लक्षात घेता मराठ्यांना आरक्षण मिळणे काळाची गरज आहे. उद्या तारीख 28 सिंधुदुर्ग सकल मराठा समाजालावतीने जाहीर करण्यात आलेल्या सिंधुदुर्ग बंद आंदोलनला आपला पाठिंबा आहे मात्र हे आंदोलन करताना कोणताही अनुचित प्रकार करु नये शांत वातावरणात हे आंदोलन व्हावे. ते पुढे म्हणाले मराठ्यांचे आंदोलन पेड होते असे सांगून काही लोकांनी या आंदोलनाची खिल्ली उडवली आहे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे एखादा समाज आपल्या समाजासाठी मागणी करत असताना त्यांच्या आंदोलनाला नाव ठेवले चुकीचे आहे राजकीय लोकांकडून असे प्रकार होता नसते परंतु टोकाची भूमिका घेऊन त्यांच्या आंदोलनावर ती का झाली हे दुर्दैव आहे असे साळगावकर यांनी सांगितले.

आंदोलनाला मिळालेली दिशा लक्षात घेता आता शासनाने यावर योग्य ती भूमिका घेऊन आवश्यक तो निर्णय घ्यावा काकासाहेब शिंदे, जगन्नाथ सोनवणे यांनी समाजाच्या मागण्यांसाठी बलिदान दिले आहे मात्र शासनाला आणखी किती बळी हवेत असा प्रश्न साळगावकर यांनी व्यक्त केला आर्थिक निकषांच्या आधारे आरक्षण जाहीर करण्यात आलेली नाही. शासन घेत असेल तर त्याचा फायदा तळागाळातील सर्व धर्मियांना होणार आहे त्यामुळे तसा निर्णय शासनाकडून देण्यात आल्यास निश्चितच आपण सकारात्मक राहू असे साळगावकर यांनी सांगितले.

Web Title: maratha kranti morcha sawantwadi