...तर मराठा क्रांती मोर्चा गनिमी काव्याने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मराठा क्रांती मोर्चाची भेट नाकारली तर गनिमी काव्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल, असे सिंधुदुर्ग मराठा क्रांती मोर्चाच्या सभेत ठरविण्यात आले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक सुहास सावंत यांनी दिली. 

कुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर मराठा क्रांती मोर्चाची भेट नाकारली तर गनिमी काव्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले जाईल, असे सिंधुदुर्ग मराठा क्रांती मोर्चाच्या सभेत ठरविण्यात आले आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक सुहास सावंत यांनी दिली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंधुदुर्गात महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने 17 सप्टेंबरला येत आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक मागण्यांकडे या युती शासनाने केलेले दुर्लक्ष त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री यांची भेट घेतली जाणार आहे.

यासंदर्भात महत्त्वपूर्ण सभा आज शनिवारी कुडाळ येथील मराठा समाज हॉल येथे घेण्यात आली. या सभेला अशोक सावंत, धीरज परब, संध्या तेरसे, प्रज्ञा राणे, रेवती राणे, संग्राम सावंत, अनिश सावंत, शैलेश घोगळे, शिरोडा पंचायत समिती सदस्य भाई परब आदी उपस्थित होते. 

सभेतील मुद्दे - 

  • या सरकारने योजना दिल्या खऱ्या पण त्या राबवण्यासाठी कोणतीही यंत्रणा दिलेली नाही,
  • शेतकऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत.
  • ऍट्रॉसिटीसंदर्भात कोणतीही कारवाई केलेली नाही

या संदर्भात मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना ठिकठिकाणी निवेदने देण्याचे ठरविले. मात्र, पोलिस यंत्रणेने ही निवेदने देण्याकडे दबावतंत्र अवलंबिले. त्यामुळे निवेदने देता आली नाही; पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देता यावे, म्हणून भाजपच्या जिल्हाध्यक्षांसह त्यांच्या दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना क्रांती मोर्चाच्यावतीने निवेदन देऊन भेट देण्याची मागणी केली आहे, पण जर ही भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाकारली, तर गनिमी काव्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल, असे ठरविण्यात आले असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे जिल्हा समन्वयक सुहास सावंत यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha wants meeting with Chief Minister Devendra Fadnavis