वाहतूक शाखा कर्मचाऱ्यास लाच घेताना पकडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

चिपळूण - सातारा येथील वाळू व्यवसायिकाकंडून लाच घेताना चिपळूणातील एका वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. ही खबर शहरात पसरल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज सायंकाळी ही कारवाई केली. याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. सातारा येथील एका वाळू व्यवसायिकाने पैशांचे बंडल बहादूर शेख नाका येथील चौकीत असलेल्या कपाटावर ठेवले. त्यावेळी सेवा बजावत असलेले गणेश नाळ या पोलिस कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले. संबधीत व्यवसायिकाकडून नाळे यानी १२ हजाराची लाच मागितल्याची चर्चा आहे.

Web Title: marathi news bribe traffic police