प्रेमप्रकरणातून तरुणाचे तरुणीवर वार!

marathi news crime boy beat the girl with the help of a weapon
marathi news crime boy beat the girl with the help of a weapon

संगमेश्वर - आपले प्रेम असलेल्या तरुणीचे दुसऱ्याशी प्रेमप्रकरण सुरु असल्याच्या संशयातून तरुणाने तरुणीवर धारधार शस्त्राने वार करत स्वतःवर सुद्धा वार केलेत. ही धक्कादायक घटना आज संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे घडली. या प्रकरणात हल्ला केलेला रोशन भिमदास कदम (२१/माखजन कदमवाडी) व हल्ला झालेली तरुणी हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. 

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, रोशनचे एका तरुणीवर प्रेम होते. कामानिमित्त तो मुंबईत असायचा. मात्र त्या तरुणीचे सध्या दुसऱ्या कुणाशी तरी प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय त्याच्या मनात होता. याचाच माग काढण्यासाठी तो गावात आला होता. आज सकाळी त्याने या तरुणीला गाठले आणि प्रकरणाचा जाब विचारत तिच्यावर धारधार कटरने वार केले. एवढ्यावरच न थांबता त्याने हातात असलेली बाटली तिच्या खांद्यावर मारली. या प्रकारात तरुणी गंभीर जखमी झाली. यानंतर रोशन याने आपल्याच हातातील हत्याराने स्वतःच्या हातावर वार करत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. दोघांनाही तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गंभीर जखमी तरुणीवर अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार करून तिला वाचवले तर रोशनची तब्येतही आता स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक महेश थिटे, माखजन दुरक्षेत्राचे कॉ. डि एस पवार व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com