देवरुख - चिमुकले रंगले रंगविश्वात

प्रमोद हर्डीकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

साडवली (देवरुख) : देवरुख शहराची रंगपंचमी शनिवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिजाउ शिशुवाटीकेतील चिमुकल्यांनी शुक्रवारी सकाळी रंगात न्हाउन निघण्याचा आनंद लुटला.

निरागस भावनेने पाणी व रंग घेवून पिचकारीने एकमेकांना रंगवत या मुलांनी रंगपंचमीचाा जणु श्री गणेशाच केला. शाळेतील पहीले पाउल व समाजजीवनात वाटचाल करताना सर्व सण वार याची माहीती घेवून आपली संस्कृती या मुलांंवर बिंबवण्याचा शिक्षिकांचा हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे.पालकांनीही या मुलांच्या रंगपंचमी उत्सवाला चांगली दाद दिली.तासभर या मुलांनी रंग विश्वात रंगून जात आपला एक दिवस यादगार बनवला.

Web Title: Marathi news devarukh news children playing rangapanchami

टॅग्स