जैन धर्मात मानवी कल्याणाची शिकवण- सुरीश्वरजी महाराज

अमित गवळे
मंगळवार, 20 मार्च 2018

पाली(रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री किशोर ओसवाल आराधना भवनाचे उद्घाटन राष्ट्रसंत आचार्य श्री चंद्रानन सागर सुरीश्वरजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदिंसह मान्यवर उपस्थित होते. 

पाली(रायगड) - सुधागड तालुक्यातील परळी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या श्री किशोर ओसवाल आराधना भवनाचे उद्घाटन राष्ट्रसंत आचार्य श्री चंद्रानन सागर सुरीश्वरजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते तसेच रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण आदिंसह मान्यवर उपस्थित होते. 

श्री परळी श्वेतांबर जैन संघाच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती पार्वतीबाई लालचंदजी ओसवाल (पाणेचा सोलंकी) परिवाराच्या वतीने 16 ते 18 मार्च अशा तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हा महोत्सव जैन मंदीर परळी येथे राष्ट्रसंत आचार्य श्री चंद्रानन सागर सुरीश्वरजी महाराज साहेब यांच्यासह अन्य मुनी महाराजांच्या कृपाशिर्वादाखाली पार पडला. यावेळी प्रवचनपर मार्गदर्शनात राष्ट्रसंत आचार्य श्री चंद्रानन सागर सुरीश्वरजी महाराज म्हणाले की जैन धर्मात मानवी कल्याणाची शिकवण सामावलेली आहे. जैन धर्म जातीवाद व सांप्रदायाची भाषा करीत नाही. जैन धर्माची शिकवण अंगिकारुन प्रत्येकाने मानवी कल्याणार्थ योगदान द्यावे असे आवाहन केले. तसेच आराधन भवनाच्या उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा देताना अनंत गिते म्हणाले की जैन धर्मात प्रेम, मैत्री व अहिंसेची शिकवण दिली जाते. येथे भेदाभेद व वाद नाही. जैन धर्माची शिकवण व तत्वज्ञान सर्वदूर पसरावे याकरीता ओसवाल कुटुंबियांनी उत्तम स्वरुपाचे आराधना भवन उभारले आहे. यावेळी शुभेच्छा देताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी ओसवाल परिवाराच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. जैन संतमुनींच्या पदस्पर्शाने व पवित्र वाणीने पावन झालेल्या किशोर ओसवाल आराधना भवनातून आदर्श व सुसंस्कारक्षम समाज घडविण्याचे महान कार्य केले जाईल अशा शुभेच्छा चव्हाण यांनी दिल्या. यावेळी परळी पंचक्रोशीत अत्यंत उत्साही व मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी केंद्रिय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, रविंद्र लालचंद ओसवाल, पार्वतीबाई लालचंद ओसवाल, श्रीपाल ओसवाल, यशपाल ओसवाल, ज्येष्ठ नेते वसंतराव ओसवाल, रायगड जि.प सदस्य सुरेश खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, शिवसेना जि.प सदस्य किशोर जैन, भा.ज.पा सुधागड तालुकाध्यक्ष राजेश मपारा,माजी नगराध्यक्ष सोहनलाल राठोड, अनिल वाघमारे, विलास मानकर आदिंसह जैन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परळी जैन श्वेतांबर संघ व रविंद्र ओसवाल परिवार मित्रमंडळींनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: marathi news jain religion surishwarji