ट्रकवरील ताबा सुटल्याने चालकाचा मृत्यु

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

कणकवली - तालुक्यातील नांदगाव पियाळी मुरकरवाडी येथे ऊस वाहतूक करणारा चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात ऊस मजूर संतोष गणपती पाटील (वय ३५, रा. पाटीलवाडी, राधानगरी) यांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडला. 

कणकवली - तालुक्यातील नांदगाव पियाळी मुरकरवाडी येथे ऊस वाहतूक करणारा चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात ऊस मजूर संतोष गणपती पाटील (वय ३५, रा. पाटीलवाडी, राधानगरी) यांचा जागीच मृत्यु झाला. हा अपघात सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडला. 

पियाळी येथे सध्या ऊस तोडणीची कामे जोरात सुरु आहेत. यामुळे पियाळी परिसरातील ऊस मळ्यात तोडलेला ऊस डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखाना, गगणबावडा येथे नेण्यासाठी मालवाहू ट्रक ये जा करत आहेत. सोमवारी रात्री पियाळी मुरकरवाडी येथुन ऊस भरुन गगणबावडा साखर कारखाना येथे आपल्या ताब्यातील ट्रक (MH.009.GA.724) चालक अब्दुल रहिमान बाळू पाटणकर (वय 40, रा. पकालवाडी, राधानगरी) हे घेऊन जात असताना पियाळी मुरकरवाडी येथील अरुंद रस्त्यावरुन त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रक क्लिनरच्या बाजूने एका घराचे गडग्याचे कुंपण तोडत साईड पट्टीवरुन घसरला. यात क्लिनर साईडच्या बाजूला बसलेले संतोष पाटील यांच्या अंगावर ट्रकचा क्लिनर साईडचा भाग कोसळल्याने ते त्यात चिरडले गेले व गाडीत अडकले. यातच त्यांचा दुदैवी जागीच मृत्यू झाला.
 या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीसाठी धावले व त्यांनी चालकाला बाहेर काढत वाचविले. मात्र मयत संतोष पाटील यांना वाचवण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचा मृतदेह कणकवली रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परीवार असून ही बातमी समजताच पाटील कुटुंबियांनी एकच टाहो फोडला. काही कोसावरुन येऊन कष्ट करुन आपले कुटुंब सांभाळणारे संतोष पाटील यांच्या अकाली जाण्याने पाटील कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. याच मार्गावरुन या ट्रक चालकाने यापूर्वी सातवेळा ऊस वाहतूक गगणबावडापर्यंत नेली होती. आज मात्र नियतीचा खेळ व वेळ आल्याने ही दुर्देवी घटना घडली.

Web Title: marathi news kokan accident truck driver died