खोदकामाची चौकशी करण्याची मागणी - माजी आमदार राजन तेली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

सावंतवाडी - आंबोली घाटात चुकीच्या पध्दतीने करण्यात आलेल्या खोदकामाची चौकशी करण्याची मागणी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती भाजपाचे नेते तथा माजी आमदार राजन तेली यांनी आज येथे दिली. सावंतवाडीसाठी जाहीर झालेल्या तहसिलदार कार्यालयाची इमारत पुर्ण करण्यासाठी योग्य त्या सुचना बांधकामाच्या अधिकार्‍यांना द्यावा, अशी मागणी यावेळी केली जाणार आहे, असे तेली यांनी सांगितले. राज्याचे बांधकाम मंत्री श्री. पाटील हे उद्या (ता. 9) जिल्हा दौर्‍यावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर श्री. तेली यांनी आज आपली भूमिका दूरध्वनीद्वारे मांडली.

ते म्हणाले, “याठिकाणी उद्या येणार्‍या मंत्र्यांना जिल्ह्यातील अनेक विकासकामे तसेच अधिकारी आणि स्थानिक नेत्यांच्या दुर्लक्षामुळे अपुर्‍या राहीलेल्या कामाची माहिती देण्यात येणार आहे. यात मुख्यत्वे आंबोली घाटाचा विषय महत्वाचा आहे. सद्यस्थिती लक्षात घेता एका मोबाईल कंपनीच्या माध्यमातून आंबोली घाटात चुकीच्या पध्दतीने संरक्षण कठडा खोदण्याचे काम झाले आहे. त्यामुळे घाटाला भविष्यात धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.”

तेली पुढे म्हणाले, “सावंतवाडी तालुक्यासाठी अडीज कोटी रुपये निधी मंजूर करुन जाहीर करण्यात आलेली प्रशासकीय इमारत अर्धवट स्थितीत आहे. अद्याप पर्यंत त्याचे काम पुर्ण झालेले नाही. त्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागली होती. त्यामुळे ही इमारत वेळेत पुर्ण करण्यात यावीत, तशा सुचना संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात याव्यात आणि ठेकेदाराकडुन काम करुन घेण्यात यावे, अशी मागणी सुध्दा यावेळी मंत्र्याकडे करण्यात आले आहे. बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील अनेक कामे रेंगाळली आहेत. यात तळवणे पुलाचा समावेश आहे. त्यामुळे याबाबत योग्य ते धोरण ठरविण्यात यावेत, अशी भाजपाच्या पदाधिकार्‍यांची मागणी असणार आहे.”

मोर्ले पारगड रस्त्याबाबत लक्ष वेधणार
यावेळी श्री. तेली म्हणाले, “उद्घाटन केल्यानंतर अनेक वर्षे रखडलेल्या मोर्ले पारगड या रस्त्यासाठी ग्रामस्थांना आंदोलन करावे लागले. त्यानंतर काम सुरू झाले; मात्र त्या कामात वनविभाग आणि बांधकाम विभाग यांच्यात सुसूत्रता नाही. त्यामुळे दोन जिल्ह्याला जोडण्यासाठी महत्वाचा दुवा ठरणार्‍या या रस्त्याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, अशी पाटील यांच्याकडे करणार आहे.”

Web Title: marathi news kokan ex mla rajan teli chandrakant patil