महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पर्यावरणपूरक होळी अभियान

marathi news kokan holi festival joy social work donation
marathi news kokan holi festival joy social work donation

पाली (जि. रायगड) - दुष्टं आणि वाईट प्रवृत्तीचं निर्दालन करणारा म्हणून होळीचा सण साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि सर्वांचा आनंद द्विगुणित करणारा असतो. याचे रुप असेच राहण्यासाठी यावर्षी रंगपंचमीला घातक रासायनिग रंगांचा वापर, प्लास्टीकचे पाण्याचे फुगे व पाण्याचा वापर टाळून प्रदूषणविरहीत आणि सुकी होळी साजरी करुया. तसेच 'होळी लहान करा, पोळी दान करा', असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत करण्यात आले आहे.

दरवर्षी या अंनिसच्या अभियानास मोठा पाठिंबा मिळतांना दिसत आहे. मागील वर्षी सुधागड तालुक्यात पाली अंनिस शाखेच्या वतीने 'होळी लहान करा, पोळी दान करा' या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळून शेकडो पोळ्या जमा झाल्या होत्या. या सर्व पोळ्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आदिवासी वाड्यांवर नेऊन वाटल्या होत्या. उन्हाच्या तडाख्यात होळीच्या निमित्तानं जाळल्या जाणाऱ्या लाकडांची ऊब खरं तर ना माणसाला फायदेशीर आहे, ना पर्यावरणाला. सरसकट वृक्षांची कत्तल करुन ती होळीसाठी वापरणं हा उत्सवाचा आणि उत्साहाचाही अतिरेकच म्हणायला हवा असे अंनिसतर्फे सांगण्यात आले आहे.

अशी साजरी करा होळी -

  • होळीसाठी झाडे तोडू नका.
  • अनेक ठिकाणी होळी पेटविण्या ऐवजी गावात एकाच ठिकाणी प्रतीकात्मक होळी पेटवा.
  • होळीनिमित्त बोंबा मारणे, अपशब्द उच्चारणे यापासून कटाक्षाने लांब रहा.
  • होळीमध्ये पोळी जाळण्याऐवजी ती पोळी गरजूंना द्या.
  • आपल्यातील दुर्गुणाची होळी करा.
  • पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कोरड्या रंगानी होळी/रंगपंचमी खेळा.
  • होळीमध्ये प्लास्टिक, टायर सारखे हानिकारक वस्तू जाळू नका.
  • होळी/रंगपंचमी साठी पर्यावरण-स्नेही रंग किंवा नैसर्गिक रंगांचा वापर करा.

होळी लहान करा, पोळी दान करा -
होळीला बरेच जण पुरणपोळी करतात आणि नैवेद्य म्हणुन ती होळीत अर्पणही करतात. अंनिस कार्यकर्ते सालाबाद प्रमाणे याही वर्षी होळीत पोळी न टाकण्याचे आवाहन करत आहेत. त्याऐवजी ती बाजुला काढून ठेवा, कोरडी राहिल असे पहा, एका कोरड्या खोक्यात, डब्यात गोळा करा. आपल्या गावातील कोणत्याही अंनिस कार्यकर्त्याला आणून द्या. त्या पोळ्या त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी गरीब वस्त्यांवर जाऊन हे कार्यकर्ते वाटणार आहेत. 'पोळी वाटणे' हा उपक्रम कोणीही एखादी गरीब वस्ती निवडून त्यांच्या पातळींवर करू शकतात. मार्गदर्शन मिळविण्यासाठी अंनिसच्या कार्यकर्त्यांना कॉल करू शकता. बळीराजाच्या अपार कष्टाने मिळवलेले अन्न त्याची मेहनत वाया न जाऊ देता कोणाच्यातरी मुखी लागले पाहिजे. त्याच्या मेहनतीची राख व्हायला नको. आपण येवढे संवेदनशील तर नक्कीच आहोत. तुम्ही तुमच्या मंडळाच्या, वाडीतल्या, वस्तीतल्या पोळ्या देण्यासाठी संपर्क साधू शकता. असे आवाहनाला अंनिसतर्फे केले आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांना आपण या क्रमांकावर संपर्क साधू शकता. - मोहन भोईर - 8411051492, अमित निंबाळकर- 9921380829, मिथुन पवार - 9225499980, रोशन रूईकर - 9270503775, रमेश चांदोरकर - 7263960611, संदेश गायकवाड (पेण) 879-606-8476, सनय मोरे (पेण) 727-655-2934.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com