करूळ हायस्कूलचा विद्यार्थी मोटारीच्या धडकेत ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

कणकवली : भरधाव मोटारीच्या धडकेत आज शाळकरी विद्यार्थी ठार झाला. सचिन शामसुंदर चव्हाण (वय 15, रा. तिवरे चव्हाणवाडी) असे त्याचे नाव असून, तो नाथ पै प्रबोधनी करूळ हायस्कूलमध्ये आठवीत शिकत होता. हा अपघात सायंकाळी फोंडा - कणकवली रस्त्यावर करूळ येथे घडला.

घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन सचिनला तातडीने रुग्णालयात नेले; मात्र दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. बोलेरो मोटारीच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सचिन आणि त्याचा चुलत भाऊ प्रथमेश दोघे करूळ हायस्कूलमध्ये शिक्षण घेतात. सायंकाळी पाच वाजता हायस्कूल सुटल्यानंतर सचिन आणि नववीत शिकणारा प्रथमेश तिवरे चव्हाणवाडी येथे सायकलने जात होते.

फोंडा ते कणकवली रस्त्याने तिवरे गावात जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या बोलेरो (एमएच 47 ई 901)ची सचिनच्या सायकलला जोरदार धडक बसली. धडकेत सचिनच्या डोक्‍याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली. करूळ रेशनिंग दुकानासमोरील नागरिकांनी तेथे धाव घेतली. तेथीलच एकाने व्हॅनमधून सचिनला उपचारासाठी कणकवलीत आणले; मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. सचिनचे आई-वडील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. मोठा भाऊ जानवली येथे व्यवसाय शिक्षण घेत आहे. सचिनच्या अपघाताची माहिती मिळताच तिवरे चव्हाणवाडीतील ग्रामस्थांनी करूळ गावात धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा फोंडाघाट पोलिस दूरक्षेत्राचे दयानंद चव्हाण यांनी केला.

Web Title: marathi news kokan news accident near kankavli