"पुस्तकांवर बोलू काही" उपक्रमात पुस्तकांना केले बोलते

Pali
Pali

पाली (रायगड) : मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पनवेल शाखेने "पुस्तकांवर बोलू काही" हा अाशयपूर्ण अभिनव उपक्रम केला. नवीन पनवेल येथील ऍम्फी थिएटर, सिडको गार्डन,सेक्टर ११, येथे मंगळवारी (ता.२७) सायंकाळी ७ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम संपन्न झाला. अनेकांना नवीन पुस्तकांची ओळख होऊन ज्ञानाची भुक भागली.

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला व निःशुल्क होता. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाची सुरुवात प्रबोधनात्मक गाण्यांनी झाली. सुरवातीला अंनिसचे महेंद्र नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या उपक्रमात पुस्तकांचा कल हा वैचारिक आणि सामाजिक का? मंडणीची वेळ ५ मिनिटेच का? अशी मांडणी करून त्यांनी समितीची कार्य ओळ्ख करून दिली.

कार्यक्रमाला २० वाचक सहभागी झाले होते. या बरोबरच अनेक श्रोत्यांची सुद्धा लक्षणीय उपस्थिती होती. तरुणांपासून वयस्कांपर्यंत सर्वाचा सहभाग उत्साहवर्धक होता. अनंताकडे झेप, विज्ञानजगत पासून संवाद स्वतःशी,चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान पासून भारतीय संविधान, पत्रिका जुळवताना पासून गोफ जन्मांतरीचे, एक होता कार्व्हर पासून स्त्री पर्व, बुद्ध की कार्ल मार्क्स पासून टिळक आणि आगरकर, कार्यरत, मला कळलेले बाबा, देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे, नग्नसत्य आणि डाकिण अशा अनेक वैज्ञानिक, वैचारिक आणि सामाजिक विषयांवरील वेगवेगळ्या पुस्तकांवर उत्तमरित्या मांडणी करण्यात आली. अगदी कमी वेळात पुस्तकाची अर्थपुर्ण मांडणी करण्याचे अाव्हान सर्वांनी उत्तम प्रकारे पेलले. अशाप्रकारे उत्साहात मराठी राजभाषा दिन साजरा झाला. अनेक नवीन साथींची व नव्या पुस्तकांशी ओळख उपस्थितांना झाली.

पुस्तकांना केले बोलके, असे झाले सादरीकरण..

1. एकाने एखादे पुस्तक वाचले असेल त्याबद्दल जास्तीत जास्त ५ मिनिटात माहिती द्यायची होती. (हे पुस्तक का वाचावे हे ऐकणाराना समजले पाहिजे, असे मुद्देसूद)

2. पुस्तक सामाजिक प्रश्नांवरचे/वैचारिक मांडणी करणारे /वैज्ञानिक /समाज कार्यकर्तें, वैज्ञानिक यांच्या चरित्रात्मक होते. ते मराठी किंवा मराठीत भाषांतरीत होते.

3. सोबत पुस्तक आणल्यास चालणार होते.

4. अापले प्रगल्भ विचार मांडण्यासाठी सुद्धा हे एक चांगले व्यासपिठ होते.

5. जे पुस्तकाची मांडणी करणार आहेत त्यांनी त्यांचे नाव व पुस्तकाचे नाव याची पूर्व नोंदणी केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com