होळी-शिमग्यानिमित्त कोकणात जाणार्‍या एसटी फुल्ल!

अमित गवळे
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

पाली : होळी-शिमगा हा कोकणातील मोठा सण म्हणून ओळखला जातो. यानिमित्त बुधवारी (ता.२८) चाकरमानी व लोक कोकणात आपल्या गावाककडे जाण्यासाठी निघाले होते. त्यामुळे कोकणाकडे जाणार्‍या एसटी बसेस फुल्ल होत्या. खाजगी वाहतुकदारांचीही चंगळ होती.

बुधवारी सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची गर्दी होती. माणगाव, कोलाड अादी ठिकाणी वाहतूक धिम्या गतीने सुरु होती. तर वडखळ, वाकण, कोलाड, इंदापूर, माणगाव अादी ठिकाणी वाहनांची गर्दी झाली होती. अनेकांनी एसटी बसेच्या बहुतांश जागांचे आधीच आरक्षण केले होते. त्यामुळे या बसेस खचाखच भरुन जात होत्या.

वेळेत आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी अनेक जण खाजगी प्रवासी वाहनांना पसंती देऊन अधिकची रक्कम खर्च करुन खाजगी वाहने भाड्याने घेऊन गावाकडे निघाले होते. याचा फायदा खाजगी प्रवासी वाहतुकदारांना झाला.

ज्या लोकांना खाजगी वाहतुक परवडण्याजोगी नव्हती व ज्यांना जवळपासच्या ठिकाणी जायचे होते त्या लोकांना मात्र एस.टी.ची वाट पाहावी लागली. कारण लांब पल्याच्या गाड्या त्यांना घेत नव्हत्या व मध्ये थांबत नव्हत्या. 

अनेक बसेस गच्च भरुन गेल्याने अनेकांनी उभे राहुनच प्रवास केला. अनेकांना मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला. कामानिमित्त निघालेले नोकरदार, शाळकरी व महाविदयालयीन विदयार्थ्यांचे मात्र हाल झाले. गाडीची वाट पाहत त्यांना खुप वेळ खोळंबावे लागले.

Web Title: marathi news kokan news Holi Celebration