जय हनुमान रासळ संघ ठरला वरदायिनी कबड्डी चषकाचा मानकरी

अमित गवळे
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

पाली (रायगड) : वरदायिनी मित्र मंडळ राबगाव आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी चषकाचा मानकरी जय हनुमान रासळ संघ ठरला आहे. तर जय भवानी वाशी संघ उपविजेता झाला.

पाली (रायगड) : वरदायिनी मित्र मंडळ राबगाव आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी चषकाचा मानकरी जय हनुमान रासळ संघ ठरला आहे. तर जय भवानी वाशी संघ उपविजेता झाला.

या स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण 32 संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन सुधागड एज्युकेश्न सोसायटीचे अध्यक्ष वसंत ओसवाल, जि.प माजी सदस्या गीता पालरेचा आदी मान्यवरांच्या हास्ते करण्यात आले. अतिशय रोमहर्षक झालेल्या या कबड्डी चषकाचा तृतीय क्रमांकाचा मानकरी बाळनंद कासू संघ तर चतुर्थ क्रमांक जय हनुमान आमडोशी संघ ठरला. यावेळी स्पर्धा निरीक्षक म्हणून संदीप देसाई तर जिल्हा असोसिएशन पंच म्हणून शरमकर,गजानन पाटील, विजय भोईर, संजय बैकर, काशिनाथ म्हात्रे यांनी कामगिरी केली. 

जय हनुमान रासळ संघाचा नितेश लहाने या चषकाचा सामनावीर झाला. उत्कृष्ट पकडचे पारितोषिक महेश जोगडेयाला मिळाले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वरदायिनी मित्रमंडळाचे पदाधिकारी,सदस्य व ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

Web Title: Marathi news kokan news kabaddi competition