'शिवसेनाप्रमुख चषक २०१८' ची दिमाखदार सुरवात

अमित गवळे 
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

पाली (जि. रायगड) - येथील जनरल अरुणकुमार वैद्य क्रिडांगणावर शनिवारी (ता. २४) 'शिवसेनाप्रमुख चषक २०१८' या मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांची दिमाखदार सुरवात झाली. या स्पर्धांचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धांच्या माध्यमातून समर्ग कबड्डीपट्टू आणि कबड्डीप्रेमींना पाली नगरीत अतुलनीय पर्वणी लाभली आहे. 

पाली (जि. रायगड) - येथील जनरल अरुणकुमार वैद्य क्रिडांगणावर शनिवारी (ता. २४) 'शिवसेनाप्रमुख चषक २०१८' या मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांची दिमाखदार सुरवात झाली. या स्पर्धांचे उद्घाटन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धांच्या माध्यमातून समर्ग कबड्डीपट्टू आणि कबड्डीप्रेमींना पाली नगरीत अतुलनीय पर्वणी लाभली आहे. 

शिवसेना रायगड व राजयोगी मित्रमंडळ सुधागड यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अधिकृत मान्यतेने व शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई तसेच रत्नागिरी कबड्डी असो. अध्यक्ष तथा शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख यांच्या प्रमुख पुढाकाराने पालीत २४ ते २७ फेब्रुवारी दरम्यान 'शिवसेनाप्रमुख चषक २०१८' राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिंपिक स्पर्धांनाही लाजवेल अशा भव्य स्टेडीयमसह अत्यंत सुसज्य व्यवस्थापन या ठिकाणी करण्यात आले आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी सांगितले. 

रायगड जिल्ह्यात अशोक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग येथे कबड्डीचे जिल्हा अकॅडमी केंद्र सुरु करीत आहोत. येथून भविष्यात देशाच्या कबड्डी संघाचे नेतृत्व करणारे खेळाडू रायगडच्या मातीतून निर्माण होतील असे गिते म्हणाले. पालीतील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा केवळ पालीच्या नव्हे तर सबंध महाराष्ट्राच्या इतिहासातील भव्य स्वरुपाच्या स्पर्धा आहेत. पुढील वर्षी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे रुपांतर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत होईल असे आश्वासन गिते यांनी दिले. यावेळी अनंत गिते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख व रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष सचिन कदम हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर, राष्ट्रीय कबड्डी पंच भगवान शिंदे व राजयोगी मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश शिंदे हे या स्पर्धांच्या नियोजनाचे काम पाहत आहेत. स्पर्धेसाठी १० हजार प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक गॅलरी, भव्य प्रकाश योजना व प्रोलींग प्रमाणे मॅट, थेट माध्यम प्रक्षेपण आदींनी परिपुर्ण असे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नामवंत संघांचा व प्रो कबड्डी स्टार खेळाडूंचा समावेश आहे.

या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमास केंद्रिय मंत्री अनंत गिते यांच्यासह शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई, रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम, शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार किशोर जैन, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. उपाध्यक्ष बाबुराव चांदोरे, शिवसेना सहसंपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड, प्रशांत मिसाळ, अॅड. राजिव साबळे, संदिप घरत, जि. प. सदस्य रविंद्र देशमुख, शिवसेना सुधागड तालुकाप्रमुख मिलिंद देशमुख, शिवसेना रोहा तालुका प्रमुख समिर शेडगे, अनिल नवगणे, संदीप दपके, पं. स. उपसभापती उज्वला देसाई, पं. स. सदस्य नंदू सुतार, रविंद्र खंडागळे, अविनाश शिंदे, उमेश तांबट, ज्योत्स्ना देसाई, वर्षा सुरावकर, सोनाली मढवी आदींसह कबड्डीपट्टू व असंख्य कबड्डी रसिक उपस्थित होते.

महाराष्ट्राची अस्मिता जपणारा कबड्डी खेळ जागतिक पातळीवर लोकप्रिय होत आहे. तांबड्या मातीतील रांगड्या खेळाने आता मॅटवर झेप घेतली आहे. सबंध जगाला आकर्षित करण्याची ताकद कबड्डी खेळात निर्माण झाली आहे. रायगड जिल्हा कबड्डीची पंढरी म्हणून ओळखला जातो. कबड्डीच्या माध्यमातून रोजगार निर्माण होऊन अनेकांचे संसार उभे राहिलेत. ग्रामिण भागातील होतकरु व प्रतिभा संपन्न खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरीता या कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, असे मत रायगडचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश देसाई यांनी व्यक्त केले. 

लाखोंची बक्षिसे - 
या स्पर्धेतील विजेत्या संघाला प्रथम क्रमांक १ लाख ११ हजार ११ रुपये, द्वितीय क्रमांक ६६ हजार ६६६ रुपये, तृतीय क्रमांक ३३ हजार ३३३ रुपये, चतुर्थ क्रमांक २२ हजार २२२ रुपये आणि आकर्षक चषक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या बरोबरच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूला बजाज प्लॅटीना बाईक व आकर्षक चषक, उत्कृष्ट चढाई पट्टू एल. ई. डी. टिव्ही व आकर्षक चषक, उत्कृष्ट पक्कड एल. ई. डी. व आकर्षक चषक, प्रतिदिन सर्वोत्कृष्ट खेळाडूला ५५५५ रुपयाचे पारितोषिक अशी वैयक्तीक बक्षिसे देखील दिली जाणार आहेत.

Web Title: marathi news kokan news kabaddi competition start