मुंबई गोवा महामार्गावर उतरुन निषेध

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

लांजा - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो, या सरकारचे करायचे काय! खाली डोक वर पाया, हमसे जो टकरायेगा ओ मिट्टी मे मिल जाएगा, भिडीच्या तोंडात किडे, निषेध असो निषेध असो भाजप सरकारचा निषेध असो, तुमचं आमचं नात काय, जय जिजावू जय शिवाजी, अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी दुपारी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी लोक हातात निळे झेंडे घेऊन मुंबई गोवा महामार्गावर उतरले.  

लांजा - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विजय असो, या सरकारचे करायचे काय! खाली डोक वर पाया, हमसे जो टकरायेगा ओ मिट्टी मे मिल जाएगा, भिडीच्या तोंडात किडे, निषेध असो निषेध असो भाजप सरकारचा निषेध असो, तुमचं आमचं नात काय, जय जिजावू जय शिवाजी, अशा गगनभेदी घोषणा देत बुधवारी दुपारी कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी लोक हातात निळे झेंडे घेऊन मुंबई गोवा महामार्गावर उतरले.  

कोरेगाव भीमा येथे दि . १ जानेवारीला शौर्य दिनाच्या घटनेला २०० वर्षे पूर्ण झाल्याने राज्यभरातून लाखोंच्या संख्येने येथे असलेल्या विजयी स्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या भिम सैनिकांवर दगडफेक केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला हाक देण्यात आली होती. या हाकेला लांजा शहरातील दुकानदार यांनी सहकार्य करून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. काही दुकाने चालू होती त्या दुकानदारांना मोर्चेकऱ्यांनी दुकाने बंद करण्याची विनंती केली. त्यानुसार संपूर्ण लांजा शहरातील कडकडीत बंद पाळण्यात आला होता. लांजा तालुक्यातील बहुजन विचार मंच, भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड, बहुजन समाज पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कुणबी समाजसेवा संघ, मराठा सेवा संघ, भारतीय बौध्दजन महासभा लांजा तालुका बौध्दजन संघ, मुस्लिम समाज, सिध्दार्थ क्रिएशन्स, रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने बुधवारी दुपारी ११.३० वा. लांजा बाजारपेठ येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक भवन, येथून पोस्ट गल्ली,  मुंबई गोवा महामार्गवरून एसटी बसस्थानक असा मोर्चा काढण्यात आला. तेव्हा मोर्चेकऱ्यांनी बसस्थानकासमोरच ठिय्या मांडून महामार्ग रोखून धरला. पाच ते दहा मिनिटे महामार्गावर मोर्चेकऱ्यांनी रोखून धरल्याने महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर घोषणा देत मोर्चा तहसीलदार कार्यालयावर येउन धडकला व तहसिलदार मारूती कांबळे यांना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. 

या निवेदनात म्हटले आहे कि,  वढू बुद्रुक येथे सामाजिक कारणावरून दोन गटात दगड फेरीच्या घटना घडल्याचे समोर येत असताना दि . १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमा  येथे शौर्य दिन कार्यक्रमास जाणाऱ्या लोकांवर काही अज्ञात टोळक्याने नगर - पुणे मार्गावरील सणसवाडी परिसरात अचानक गाड्यांवर दगडफेक करून भ्याड हल्ला केला आहे. यामध्ये अनेकजण जखमी व एक मृत्यूमुखी पडला आहे. हि घटना पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. कार्यक्रमावर परिणाम करण्याचा दृष्टीने काही समाजकंटकांनी सामाजिक सलोखा धोक्यात आणण्याकरिता वरील नमूद केलेला प्रकार आहे. सदरचा प्रकार पूर्वनियोजित कट असून या प्रकरणाची कसून चौकशी करून संबंधित हल्लेखोरांना व संघटनांच्या प्रतिनिधींना पायबंद करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी अन्यथा याविरुद्ध उग्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.  

या मोर्चामध्ये भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष दिपक पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष मिथिलेष देसाई, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष आनंदा कांबळे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र देसाई, बहुजन विचार मंचाचे व लांजा तालूका बौध्दजन संघाचे अध्यक्ष सुधाकर कांबळे, उपाध्यक्ष संजय कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रदेशाध्यक्ष अजित विश्वासराव, मुस्लिम समाजाचे अकबर नाईक, हुसेन नेवरेकर, रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष लहू कांबळे,  सिध्दार्थ क्रिएशन्सचे समीर जाधव, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष पांडूरंग दाभोळकर, पं. स. सभापती दिपाली दळवी, शिवसेना तालुका प्रमुख संदिप दळवी, भारतीय बौध्दजन महासभा उपाध्यक्ष श्रीकांत कांबळे, पं. स. सदस्य मानसी आंबेकर,  लिला घडशी, कुणबी समाज सेवा संघाचे आदिंसह गावागावातून हजारोंच्या संख्येने भिमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा शांततेत पार पडला. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

Web Title: Marathi News Kokan News Lanja Mumbai Goa Highway Koregaon Bhima Protest