पाच वर्षांच्या पुनीतला कॅलेंडर तोंडपाठ

अमित गवळे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

पाली : पालीतील पाच वर्षाच्या पुनीत ओसवाल या लहानग्याची तल्लख बुध्दीमत्ता व स्मरणशक्तीने सारेच अावाक झाले आहेत. अद्याप साध्या चाॅकलेटची चव न घेतलेला पुनित २०१६ पासून ते २०२८ पर्यंत ची कोणतीही तारीख सांगितली असता क्षणात वार सांगतो. खोपोली ते सीएसटी पर्यंतच्या सर्व रेल्वे स्टेशनची नावे तो सांगतो तसेच घरातील मंडळींचे मोबाईल नंबरही त्याच्या तोंडपाठ आहेत.

पालीतील कंत्राटदार उत्तम ओसवाल यांचा नातू असलेल्या पुनीतचे वडील विनय ओसवाल अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर असून एका केमिकल्स कंपनीत उच्च पदावर कामावर अाहेत. तर अाई रिना ओसवाल महाविद्यालयात संगणक विषयाच्या प्राध्यापिका आहेत.

सीनियर केजीमध्ये शिकत असलेल्या पुनीतच्या या असामान्य बुद्धिमत्तेचे जाणीव नुकतीच त्याच्या पालकांना झाली. पुनीतचे वडील विनय ओसवाल यांनी सांगितले की घरी आलेल्या मित्राने सहज पुनीतला जन्म तारीख विचारली ती बरोबर सांगितल्यावर त्यावेळी वार कोणता होता हे विचारले व त्याने वार अचूक सांगितला. त्यानंतर घरातील प्रत्येकाने तारीख सांगितली व त्याने वार अचूक सांगितले. याबाबत त्याची अाईने पुनितला विचारले की तु हे कसे सांगतो तेव्हा तो म्हणाला की तुझ्या मोबाईलवर मी सर्व वर्षाचे कॅलेंडर एकदा बघितले होते. अाणि अशा प्रकारे तीक्ष्ण निरीक्षण शक्तीने त्याने हि बाब लक्षात घेतली.

घरातील सर्व जणांचे जवळपास आठ ते दहा मोबाईल नंबर तो सांगतो. त्याचे उच्चार व बोलणे स्पष्ट आहे. पुनीतच्या अाईने सांगितले कि एक वेळेस पुनीतसह आम्ही दोघांनी कर्जत ते कल्याण लोकलने प्रवास केला आणि घरी आल्यावर त्याने आम्हांला सर्व स्टेशनची नावे क्रमाने सांगितली. अाता तो खोपोली ते सीएसटी पर्यंतच्या सर्व स्टेशनची नावे सांगतो. तो पाहत असलेल्या टिव्हिवरील सर्व मालिका कधी पासून सुरु झाल्या अाहेत ते देखिल तो सांगतो. त्याच्या अावडती मालिका तारक मेहता का उलटा चष्मा हि आहे. त्यातील सर्व कलाकारांची नावे तो सांगतो.

रस्त्यावरून जाणार्या गाड्या पाहिल्यावरदेखील त्या कोणत्या कंपणीच्या आहेत व माॅडेल कोणते अाहे ते सांगतो. नवीन गाडया असतील तर त्यांची महिती मिळवून घेतो.

पुनीतने चॉकलेट व गोड पदार्थ अजूनही खाल्लेले नाही ते त्याला आवडतच नाही. तो आहारात भेंडीची भाजी, बाजरी आणि मक्याची पेस्ट, डाळभात हेच पदार्थ खातो. मोबाईलवर निरनिराळ्या रेल्वेच्या गाड्यांचा वेग पाहणे त्याचा आवडीचा छंद आहे. अशा हा अलौकिक बुद्धिमत्तेच्या मुलाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

गणित विषयाबद्दल त्याला विशेष आवड आहे. खेळकर स्वभाव व लहान असल्यामुळे त्याच्या बुद्धिमत्तेची पूर्णपणे सध्या ओळख होत नाही. त्याच्या या प्रगल्भ बुद्धिमत्तेला वाव मिळण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याला कुठल्याही प्रकारचे विषेश क्लासेस किंवा मार्गदर्शन दिलेले नाही. याबाबतीत कोणी विशेष मार्गदर्शन करणारे तज्ञ मिळाले तर आम्ही त्यांचा सल्ला निश्चित पणे घेऊ.
- विनय ओसवाल, पुनीतचे वडील

Web Title: marathi news Kokan News Pali Puneet Oswal