रायगड : मोहोपाडा येथे कामगार वसाहतीतील रस्ते खड्डेमयच

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

रसायनी (रायगड) : वासांबे मोहोपाडा येथील पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील कामगार वसाहतीत पथदिवे बदलण्यात आले आहेत. त्यावेळी रस्त्यावर खोदकामामुळे आणि पावसाळ्यात पडलेले ठिकठिकाणी खड्डे आजुन  बुजविण्यात आले नाही. त्यामुळे जाताना वाहन चालक त्रस्त होत आहे. एमआयडीसीला हे खड्डे बुजविण्याच्या कामाचा विसर पडला की काय आसा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.  

पथदिवे बदलण्याचे काम करत असताना विजेची केबल टाकण्यासाठी रस्त्यावर सहा सात ठिकाणी आडवे खोद काम करण्यात आले होते. तर हे काम मार्च 17 मध्ये संपल्यावर खड्डे बुजविण्यात आले नाही. त्यानंतर पावसाळ्यात आजुन खड्डे पडले आहे. आता हे खड्डे वाहतुकीला त्रासदायक ठरत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. या खड्डयांनमुळे दुचाकी वाहनावरून मुलांना शाळेत सोडताना तोल जाण्याची भिती व्यक्त होत आहे. 

साधारण एक महिन्यापूर्वी पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यावर पडलेले खड्डे एमआयडीसीने बुजविले आणि त्यावर मोठे पॅच मारून डांबरीकरण केले आहे. मात्र एमआयडीसी कामगार वसाहतीतील रस्त्यांवर पडलेले खड्डयांन कडे दुर्लक्ष केल्याने रहिवाशी एमआयडीसीच्या  विरोधात नाराजी व्यक्त करत आहे. 

परीसरात कारखान्यांतील कामगारांच्या कॉलनीत आणि  अकरा गृहनिर्माण सोसायटीत नागरिक रहात आहे. तसेच जनता विद्यालय, प्रिया स्कूल, ओम बाल विकास, या शाळा आहे. या शाळांमध्ये  हजारो  विद्यार्थी शिकत आहे. त्यामुळे येथील  रस्त्यावर विद्यार्थी, पालक, रहिवाशी, इतरांची नेहमी वर्दळ असते. दरम्यान खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात यावेत आशी मागणी पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशनने केली आहे. 

Web Title: Marathi news kokan news potholes on road