रायगड - रसायनीत दहावीची परीक्षा सुरळीत चालू

लक्ष्मण डुबे
गुरुवार, 1 मार्च 2018

रसायनी (रायगड) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी दहावीची परीक्षा आज (ता. 1) सुरू झाली आहे. आजचा पहिला पेपर असल्याने पालकांनी रसायनीतील वासांबे मोहोपाडा येथील प्रिया स्कूल केंद्रावर विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील केंद्र क्रमांक 7611 केंद्रावर परीसरातील शाळांन मधील 703 विद्यार्थी बसले आहे. आज पहिला मराठी भाषेचा पेपर असल्याने मोहोपाडा, सावळे, गुळसुंदे आणि चावणे येथील मराठी माध्यमाच्या शाळांन मधील 405 विद्यार्थी परीक्षेस बसले आहे. असे सांगण्यात आले. केंद्र प्रमुख म्हणुन प्रिया स्कूलच्या मुख्यध्यापिका मधु शैलेन्द्र काम पहात आहे. 

पहिला पेपर असल्याने  विद्यार्थ्यांना जनता विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय सुपेकर, पर्यवेक्षक सीताराम पवार, चावणे माध्यमिक विद्यालयाचे मुख्यध्यापक पद्माकर झिंगे शुभेच्छा देण्यासाठी  केंद्रावर उपस्थित होते. 

Web Title: Marathi news kokan news raigad 10th exam starts rasayani