रायगड - रसायनीत पर्यायी पूलाचे काम रखडले

लक्ष्मण डुबे 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

रसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला खेटुन आजुन दुसरा एक पुल बांधण्यात येणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी ठेकेदाराला काम सुरू करण्याचे दोन महिन्यापुर्वी परमीट मिळाले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरवात आजुन झाली नसल्यामुळे कारखानदार आणि नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.  

रसायनी (रायगड) : पाताळगंगा नदीवर जुन्या पुलाला खेटुन आजुन दुसरा एक पुल बांधण्यात येणार आहे. पुलाच्या बांधकामासाठी ठेकेदाराला काम सुरू करण्याचे दोन महिन्यापुर्वी परमीट मिळाले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरवात आजुन झाली नसल्यामुळे कारखानदार आणि नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.  

पाताळगंगा औद्योगिक क्षेत्राला जोडणाऱ्या पराडे ते सिध्देश्वरी या मुख्य रस्त्यावर पाताळगंगा व अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रात तसेच वडगाव, इसांबे, माझगाव, चावणा, जांभिवली, कराडे खुर्द या ग्रामपचायतीच्या हाद्दीतील गावांकडे जाणाऱ्या वाहनाची वर्दळ वाढल्याने वाहतुकीचा ताण पडू लागल्याने एमआयडीसीने या रस्त्याचे मजबूतीकरण व रूंदीकरणांचे काम जून 2015 मध्ये पूर्ण केले आणि रस्ता वाहतुकीस खुल्ला केला आहे. मात्र मार्गावरील पाताळगंगा नदी वरील पुलाचे बांधकाम आजुन सुरू झालेले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे. 

ठेकेदाराला बांधकाम सुरू करण्यासाठी परमीट मिळवून दोन महिने उलटले मात्र अजूनही बांधकामास सुरूवात झालेली नाही. ठेकेदारांनी नदीच्या तीरावर बांधकामाचे साहित्य ठेवण्यासाठी शेड बांधुन ठेवली आहे. प्रत्यक्षात बांधकामास केव्हा सुरवात होणार आशी चर्चा कारखानदांर आणि नागरिक करत आहे. 

एमआयडीसीच्या पराडे ते सिध्देश्वरी या मुख्य रस्त्याच्या रूंदीकरणा बरोबरच दुसऱ्या पुलाचे बांधकाम झाले पाहीजे होते. मात्र रस्त्याचे रूंदीकरण झाले. त्यानंतर पावने तीन वर्षापासून पूल बांधण्याचे काम रखडले आहे. दोन महिन्यापूर्वी बांधकामाचा ठेका देण्यात आला मात्र कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली नाही. त्यासाठी बांधकाम लवकरात लवकर सुरू करावे, असे पाताळगंगा रसायनी इंडस्ट्रीज आसोशिएशनचे माजी महासचिव चंद्रशेखर शेंडे यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news kokan news rasayani bridge parallel bridge